शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
3
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
4
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
5
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
6
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
7
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
8
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
9
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
10
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
11
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट
12
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
13
पत्नीचा विरह सहन होईना! घटस्फोटानंतर पतीनं जेवण सोडलं; ३० दिवस फक्त बिअर पिऊन जगला, मग जे घडले...
14
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
15
Nag Panchami 2025: नागपंचमीला उघडतो मंदिराचा तिसरा दरवाजा; काय दडले आहे तिथे?
16
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
17
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
18
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
19
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
20
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले

ग्रामीणमध्ये बालरोगतज्ज्ञांचा अभाव; शहरांत तज्ज्ञ डॉक्टरांची फौज !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:29 IST

वाशिम : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना संसर्ग होण्याची शक्यता अधिक असल्याचा अंदाज वर्तविला जात असल्याने जिल्हा प्रशासनासह आरोग्य ...

वाशिम : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना संसर्ग होण्याची शक्यता अधिक असल्याचा अंदाज वर्तविला जात असल्याने जिल्हा प्रशासनासह आरोग्य विभाग आतापासूनच अ‍ॅक्शन मोडवर आला आहे. दरम्यान, प्राथमिक आरोग्य केंद्रात बालरोगतज्ज्ञांचा अभाव असल्याने ग्रामीण भागावर विशेष लक्ष केंद्रित करावे लागणार आहे. दुसरीकडे शहरी भागात जिल्हा सामान्य रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालयात आठ बालरोगतज्ज्ञ उपलब्ध असून, खासगी बालरोगतज्ज्ञांचीही मदत घेतली जाणार आहे.

जिल्ह्यात ३ एप्रिल २०२० रोजी ग्रामीण भागातच पहिला कोरोना रुग्ण आढळून आला होता. पहिल्या लाटेत सुदैवाने बालकांना कोरोनाचा संसर्ग झाला नाही. कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत जनजीवन प्रभावित होत आहे. दुसरी लाट ओसरणे अद्याप बाकी असतानाच, तिसऱ्या लाटेचा अंदाजही तज्ज्ञांकडून वर्तविला जात आहे. तिसऱ्या लाटेत लहान मुलांना जास्त धोका संभवण्याची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तविली जात आहे. या परिस्थितीला तोंड देण्यासाठी जिल्ह्यात बालरोगतज्ज्ञांची ‘टास्क फोर्स’ स्थापन करण्याला प्राधान्य दिले जात आहे. शहरी भागात जिल्हा सामान्य रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालयात येथे बालकांसाठी बेडची व्यवस्थाही केली जात आहे. जिल्हा सामान्य रुग्णालय, जिल्हा स्त्री रुग्णालय येथे सहा तर उपजिल्हा रुग्णालय कारंजा येथे दोन बालरोगतज्ज्ञ उपलब्ध आहेत. दुसरीकडे ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांत मात्र बालरोगतज्ज्ञ उपलब्ध नसल्याने आरोग्य विभागाने ग्रामीण भागात विशेष लक्ष द्यावे लागणार आहे. यासाठी आतापासूनच बालरोगतज्ज्ञांची मोट बांधली जात आहे. तिसऱ्या लाटेत कोरोनापासून बालकांना वाचविण्यासाठी आतापासूनच जिल्हा प्रशासनासह आरोग्य विभागाकडून पूर्वतयारी केली जात असल्याचे दिसून येते.

०००००००००००००

बॉक्स

एकूण कोरोनाबाधित ३९१३१

बरे झालेले रुग्ण ३५९३७

उपचार घेत असलेले रुग्ण २७५४

१० वर्षांपेक्षा कमी वयाचे रुग्ण ८६०

११ ते १८ वर्षे वयोगटातील रुग्ण १२९०

००००००

जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे २५

बालरोगतज्ज्ञ ००

...

उपजिल्हा रुग्णालय बालरोगतज्ज्ञ ०२

..

जिल्हा रुग्णालय बालरोगतज्ज्ञ ०६

०००००००००००००००

ग्रामीण भागात स्थिती वाईट

जिल्ह्यात २५ प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि १५३ उपकेंद्रे आहेत. ग्रामीण भागातील आरोग्य सेवा बळकट करण्यावर भर दिला जात आहे. दुसरीकडे तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध होत नसल्याने, आहे त्या मनुष्यबळावरच दर्जेदार आरोग्य सेवा देण्याचा प्रयत्न आरोग्य विभागाकडून केला जात आहे. तिसऱ्या लाटेत बालकांना अधिक धोका असल्याचा अंदाज वर्तविला जात असल्याने बालरोगतज्ज्ञांची सेवा उपलब्ध कशी होईल, या दृष्टिकोनातून प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले जात आहे. खासगी बालरोग तज्ज्ञांची मोटही बांधली जात आहे. वेळप्रसंगी ‘कॉल ऑन’ स्वरूपात मदतही घेण्याचा विचार प्रशासनातर्फे केला जाईल, असेही सांगण्यात येते.

००००००

शहरी भागात ऑक्सिजन, व्हेंटिलेटरची सुविधा उपलब्ध करण्यावर भर !

दुसऱ्या लाटेत १८ वर्षांखालील कोरोनाचे २१५० रुग्ण असून, यामध्ये १० वर्षांखालील ८६० रुग्णांचा समावेश आहे. २०११ च्या जनगणनेनुसार जिल्ह्यात ० ते ६ वर्षे वयोगटातील बालकांची संख्या १ लाख ५२ हजार १९० होती. कोरोनाची तिसरी लाट लहान मुलांना प्रभावित करण्याची शक्यता गृहीत धरून जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी आरोग्य यंत्रणेसह उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांना तालुक्यातील बालरोगतज्ज्ञांची बैठक घेण्याच्या सूचना दिल्या.

त्यानुसार बालकांमधील कोरोना रोखण्यासाठी विविध प्रकारचे लसीकरण, पोषण आहार वितरण, बेडची उपलब्धता यासंदर्भात ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ तयार करून पुढील कार्यवाही केली जाणार आहे. जिल्हा सामान्य रुग्णालय, जिल्हा स्त्री रुग्णालय परिसरातील कोविड हॉस्पिटलमध्येदेखील ऑक्सिजन, व्हेंटिलेटरची सुविधा उपलब्ध करण्यावर भर दिला जाणार आहे. याशिवाय खासगी बालरोगतज्ज्ञांचीही मदत घेतली जाणार आहे.

००००००

३१५ बेड

तिसऱ्या लाटेत बालकांना कोरोना संसर्ग झाला तर योग्य उपचार मिळावे याकरिता प्राथमिक टप्प्यात जिल्हा सामान्य रुग्णालय, जिल्हा स्त्री रुग्णालय परिसरातील कोविड हॉस्पिटलमध्ये ५० आणि कारंजा उपजिल्हा रुग्णालय येथे २५ बेडची तयारी चालविली आहे. यामध्ये आणखी वाढ होऊ शकते. तसेच खासगी बालरोगतज्ज्ञदेखील २४० बेड उपलब्ध करणार आहेत. प्रारंभिक टप्प्यात एकूण ३१५ बेड तयारी करण्यात येणार आहे.

००००००००००००

कोट बॉक्स (फोटो)

तिसऱ्या लाटेपासून बालकांना सुरक्षित ठेवण्यासाठी आतापासूनच शहरासह जिल्ह्यातील बालरोगतज्ज्ञांची मोट बांधण्यावर आरोग्य विभागाने भर दिला आहे. याअनुषंगाने २२ मे रोजी शहरासह जिल्ह्यातील बालरोगतज्ज्ञांची बैठकही घेण्यात आली. जिल्हा सामान्य रुग्णालय, जिल्हा स्त्री रुग्णालय येथे सहा आणि कारंजा उपजिल्हा रुग्णालय येथे दोन असे एकूण आठ बालरोगतज्ज्ञ उपलब्ध आहेत. याशिवाय खासगी बालरोग तज्ज्ञांनीदेखील २४० बेडची तयारी दर्शविली आहे.

- डॉ. मधुकर राठोड

जिल्हा शल्यचिकित्सक

000000000