शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
2
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
3
India Pakistan: एटीएम २-३ दिवस बंद राहणार? व्हायरल मेसेजबद्दल सरकारने केला खुलासा
4
Operation Sindoor Live Updates: राज्यांना आपत्कालीन अधिकारांचा वापर करण्याची परवानगी, गृह मंत्रालयाचा निर्णय
5
हा दिग्गज १०८ अब्ज डॉलर्सची संपत्ती दान करणार; ठरणार आजवरचं सर्वात मोठं परोपकारी कार्य
6
भारतीय सेनेचा 'सुपर हीरो', पाकिस्तानच्या नाकीनऊ आणलं! काय आहे 'आकाश'मध्ये खास?
7
'सर, मला फक्त एकदा परवानगी द्या, मी पाकिस्तानविरूद्ध..."; बिहारच्या शिक्षकाचे पत्र व्हायरल
8
जगा आणि जगू द्या..; मेहबूबा मुफ्तींचे रडत-रडत भारत आणि पाकिस्तानच्या प्रमुखांना आवाहन
9
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर RSSची मोदी सरकारच्या पाठीवर कौतुकाची थाप, भारतीय सैन्याचे केले अभिनंदन
10
Gold Price 9 May : भारत-पाक तणावादरम्यान सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर?
11
India Pakistan War: 'आमचे पंतप्रधान भित्रे, ते मोदींचे नाव घ्यायला घाबरतात'; पाकिस्तानी खासदाराने त्यांच्याच सरकारला सुनावले
12
"सत्याला अभिनय करु नको असं सांगितलंय", महेश मांजरेकरांचा लेकाबद्दल खुलासा, म्हणाले- "ट्रोल केल्यावर मी..."
13
India Pakistan Vidoe: पाकिस्तानने डागलेली उखळी तोफ थेट घरावर, क्षणात दिसेनासं झालं, बघा काय घडलं?
14
यशस्वी जैस्वालचा यू-टर्न ! गोवा नव्हे, मुंबई संघाकडूनच क्रिकेट खेळणार... काय दिलं कारण?
15
हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त! पाकिस्तानच्या गोळीबारात जुळ्या भावंडांचा मृत्यू
16
पाक लष्कर प्रमुखाला मिळाली विशेष 'पॉवर'; पाकिस्तानी सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
17
लग्नाच्या अवघ्या १५व्या दिवशीच नवरीनं उडवली सासरची झोप; नवरदेवालाही लावला चुना अन्...  
18
Mumbai: टाटा मेमोरियल हॉस्पिटलला बॉम्बने उडवून देण्याची धमकी; भारत- पाकिस्तान तणावादरम्यान मेल
19
उद्यापासून महाराष्ट्रातील या ठिकाणी पेट्रोल पंपावर UPI पेमेंट बंद; कारण काय? जाणून घ्या...
20
तुमच्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी आर्थिक नियोजन कसे करावे? महागाई लक्षात घेऊन 'या' टिप्स फॉलो करा

प्राथमिक आरोग्य केंद्रांत एमबीबीएस डॉक्टरांची उणीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:38 IST

आरोग्य विभागाकडून प्राप्त माहितीनुसार, जिल्ह्यात २५ प्राथमिक आरोग्य केंद्र, १५३ उपकेंद्र, ६ तालुका आरोग्य अधिकारी कार्यालये, ९ आयुर्वेदिक दवाखाने, ...

आरोग्य विभागाकडून प्राप्त माहितीनुसार, जिल्ह्यात २५ प्राथमिक आरोग्य केंद्र, १५३ उपकेंद्र, ६ तालुका आरोग्य अधिकारी कार्यालये, ९ आयुर्वेदिक दवाखाने, १ अ‍ॅलोपॅथी दवाखाना आणि १ जि. प. प्रशिक्षण केंद्र कार्यान्वित आहे. नमूद दवाखान्यांमध्ये रुग्णसेवा देण्याकरिता केवळ २७ कायमस्वरूपी एमबीबीएस डॉक्टर कार्यरत आहेत. नियमित बीएएमएस डॉक्टरांची संख्या केवळ ४ असून बंधपत्रिक एमबीबीएस १, कंत्राटी एमबीबीएस ७ आणि कंत्राटी बीएएमएस डॉक्टरांची संख्या १६ आहे. तथापि, मोठ्या प्रमाणात रिक्त असलेल्या डॉक्टरांच्या पदांमुळे रुग्णसेवा वारंवार प्रभावित होत असून रुग्णांची गैरसोय होत आहे.

...................

२५

जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र

२७

एमबीबीएस डॉक्टरांची पदे

२७

रिक्त पदांची संख्या

..............

उपकेंद्र बीएएमएस डॉक्टरांच्या हवाली

जिल्ह्यात १५३ प्राथमिक आरोग्य उपकेंद्र कार्यान्वित आहेत. त्याठिकाणी एकही एमबीबीएस डॉक्टर कार्यरत नसून १०० सीएचओंना (समुदाय आरोग्य अधिकारी) नियुक्ती देण्यात आलेली आहे. आयुष्यमान भारत योजनेतून कंत्राटी तत्त्वावर भरण्यात आलेल्या या पदांचा विशेष लाभ होताना दिसत नाही. त्यातच प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या जवळ असलेल्या उपकेंद्रांना तर कंत्राटी बीएएमएस डॉक्टरही पुरविण्यात आलेला नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली.

..............

कोट :

जिल्ह्यात २५ प्राथमिक आरोग्य केंद्र आणि १५३ उपकेंद्रांच्या माध्यमातून ग्रामीण भागात रुग्णसेवा दिली जाते. सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये एमबीबीएस डॉक्टर्स कार्यरत आहेत. याशिवाय काही पदे कंत्राटी तत्त्वावर भरण्यात आली असून दर्जेदार सुविधा पुरविण्याचा पुरेपूर प्रयत्न केला जात आहे.

- डॉ. अविनाश आहेर

जिल्हा आरोग्य अधिकारी, वाशिम