शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

शेतमाल धनादेशाचा लोचा

By admin | Updated: November 19, 2016 02:27 IST

मध्यवर्ती बँकेत सर्वाधिक शेतकर्‍यांचे खाते असल्याने शेतक-यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

वाशिम, दि. १८- ५00 व १000 रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून बंद केल्यानंतर, नोटांच्या तुटवड्याचा सर्वाधिक फटका शेतकर्‍यांना बसत आहे. बाजार समिती किंवा नाफेडमध्ये शेतमाल विक्री केल्यानंतर धनादेशद्वारे प्राप्त होणारी रक्कम मध्यवर्ती बँकेतून कधी मिळेल, या शंकेने शेतकर्‍यांना ग्रासले आहे.देशहितासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५00 व १000 रुपयांची नोट रद्दबातल ठरविण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून चलनातून बाद ठरलेल्या नोटा बदलविण्यासाठी नागरिकांच्या रांगा बँकांसमोर लागत आहेत. चलनातील नोटा पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्याने तुटवडा निर्माण होत आहे. या तुटवड्यामुळे मध्यंतरी कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद ठेवाव्या लागल्या. शेतमाल खरेदी-विक्रीचे व्यवहार धनादेशद्वारे करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी व जिल्हा उपनिबंधक ज्ञानेश्‍वर खाडे यांनी केल्यानंतर बाजार समित्या पूर्ववत झाल्या तसेच नाफेडद्वारे शेतमाल खरेदी सुरू झाली. शेतमाल विक्रीनंतर धनादेशाद्वारे शेतकर्‍यांच्या बँक खात्यात शेतमालाची रक्कम जमा होणार आहे. जिल्ह्यात दीड लाखांवर शेतकर्‍यांकडे दि अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे खाते आहे. रिझर्व्ह बँकेने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या काही व्यवहारावर काही निर्बंध आणले. मध्यवर्ती बँकेला जून्या नोटा स्वीकारण्यास मनाई केली. मध्यवर्ती बँकेकडे पुरेशा प्रमाणात चलन उपलब्ध नसल्याची माहिती आहे. त्यामुळे शेतमाल विक्री केल्यानंतर मध्यवर्ती बँकेतून वेळेवर ही रक्कम मिळाली नाही तर, या शंकेने जिल्हा मध्यवर्ती बँकेचे खातेदार असलेल्या शेतकर्‍यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती व नाफेडकडे पाठ फिरविल्याचे दिसून येते. राष्ट्रीयीकृत व अर्बन बँकेचे खातेदार असलेले शेतकरी मात्र शेतमाल विक्रीसाठी आणत असल्याचे चित्र आहे; मात्र अशा शेतकर्‍यांची संख्या अल्प असल्याने बाजार समित्यांमधील आवक प्रचंड प्रमाणात घटली आहे.