००००००००
तामशी येथे दोन कोरोना रुग्ण
वाशिम : वाशिम तालुक्यातील तामशी येथे दोन जणांचा कोरोना चाचणी अहवाल बुधवारी पॉझिटिव्ह आला. आरोग्य विभागाने इतरांची तपासणी केली असून, खबरदारी घेण्याचा सल्ला दिला.
००००
पशुसंवर्धन विभागातील आठ पदे रिक्तच
वाशिम : जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागात वर्ग दोन दर्जाची आठ पदे रिक्त असल्याने प्रशासकीय कामकाज बऱ्याचअंशी प्रभावित होत आहे. गत दीड वर्षापासून ही पदे भरण्यात आली नाहीत. पशुसंवर्धन डाॅक्टर केव्हा मिळणार, याकडे पशुपालकांचे लक्ष लागून आहे.
००००
वाहनांतून प्रदूषण; कारवाईची मागणी
वाशिम : बहुतांश जीप, ऑटो, दुचाकी वाहने जुनी झाली असून, ही वाहने सर्रास रस्त्यावरून धावत असल्याने प्रदूषण होत आहे. संबंधित यंत्रणेने त्यावर निर्बंध लादून प्रदूषणाची समस्या दूर करावी, अशी मागणी होत आहे.
०००
विद्युत पुरवठ्यात वारंवार व्यत्यय
वाशिम : रिसोड शहर परिसरात ढगाळ वातावरण असून, अधूनमधून सुसाट वारा व पाऊसही होत आहे. यामुळे विद्युत पुरवठ्यात वारंवार व्यत्यय निर्माण होत आहे.