शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात २८ सप्टेंबरपासून कोविड-१९ धडक लसीकरण मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:44 IST

जिल्ह्यात १६ जानेवारी २०२१ पासून कोविड-१९ लसीकरणाला सुरुवात झाली असून, आजवर ६,९८,२६४ डोस देण्यात आले. हे प्रमाण निर्धारित उद्दिष्टाच्या ...

जिल्ह्यात १६ जानेवारी २०२१ पासून कोविड-१९ लसीकरणाला सुरुवात झाली असून, आजवर ६,९८,२६४ डोस देण्यात आले. हे प्रमाण निर्धारित उद्दिष्टाच्या ४३ टक्के आहे. जिल्हा परिषदेने हे प्रमाण वाढविण्यासाठी कोविड-१९ धडक लसीकरण मोहीम राबविण्याचे ठरविले आहे. या अंतर्गत २८ सप्टेंबर ते २ ऑक्टोबरदरम्यान ही मोहीम राबवली जाणार आहे. यासाठी जिल्ह्यातील ज्या गावांत लसीकरणाचे प्रमाण कमी आहे, त्या गावांची निवड करण्यात आली आहे. या गावांत कार्यरत शिक्षण विभाग, कृषी विभाग, महिला आर्थिक विकास महामंडळ, महिला बचत गट, एकात्मिक बालविकास प्रकल्प, ग्रामपंचायत, महसूल विभाग व आरोग्य विभाग यामधील कर्मचाऱ्यांच्या जबाबदाऱ्या निश्चित करून जिल्हास्तरावरून कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. मोहिमेदरम्यान जि.प.अंतर्गत सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्या त्या विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना व अधिकाऱ्यांना आपल्या स्तरावरून अवगत करावे, जेणेकरून ही मोहीम यशस्वीरित्या पार पाडली जाईल, असे आवाहन जि.प. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी केले आहे.

०००००००००००००

प्रभागनिहाय नीअर टू द होम लसीकरण सत्र

लसीकरण मोहिमेसाठी प्रा. आरोग्य केंद्र स्तरावरील २६ रुग्णवाहिका, ८ लसीकरण वाहनांच्या आधारे गावामध्ये प्रभागनिहाय पद्धतीने नीअर टू द होम पद्धतीने लसीकरण सत्रांचे आयोजन केले जाणार आहे. या लसीकरण सत्राकरिता तालुकानिहाय पर्यवेक्षणासाठी नोडल अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.

०००००००००००००००

गावागावांत जनजागृती

लसीकरण मोहिमेचा वंचित लाभार्थ्यांना लाभ मिळावा म्हणून संबंधित गावांत दोन दिवस अगोदर दवंडी किंवा स्पीकरव्दारे जनजागृती करण्यात येणार आहे. या मोहिमेत शिक्षक, ग्रामसेवक, कृषी सहायक, आशा अंगणवाडीसेविका, महिला बचत गट संयोजिका, आरोग्यसेवक, आरोग्यसेविका, समुदाय आरोग्य अधिकारी, तलाठी, ग्रामपंचायत कर्मचारी व गावातील प्रतिष्ठित व्यक्तींचा सहभाग घेण्यात येणार आहे.

००००००००००००००

मोहिमेस सहकार्याचे आवाहन

लसीकरण मोहिमेत पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, धर्मगुरू, प्रभावशाली व्यक्ती व स्वयंसेवी संस्था यांनी सहकार्य करावे, असे आवाहन जि.प. अध्यक्ष डॉ. श्याम गाभणे, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील निकम तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश अहेर यांनी केले आहे.