शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

वाशिममधील ४९१ ग्रामपंचायतींचा लेखा परिक्षणाला ‘कोलदांडा’!

By admin | Updated: January 5, 2017 20:38 IST

१४ व्या वित्त आयोगांतर्गत ‘परफॉर्मन्स ग्रॅन्ट’ मिळवायची असेल तर दोन वर्षाआतील कालावधीचे लेखापरिक्षण करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

 सुनील काकडे/ऑनलाइन लोकमत
 वाशिम, दि. 5 -  १४ व्या वित्त आयोगांतर्गत ‘परफॉर्मन्स ग्रॅन्ट’ मिळवायची असेल तर दोन वर्षाआतील कालावधीचे लेखापरिक्षण करणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र, शासनाने १ फेब्रुवारी २०१६ रोजी दिलेल्या या निर्देशाची पायमल्ली करित जिल्ह्यातील एकाही ग्रामपंचायतीने अद्याप अद्ययावत लेखापरिक्षण जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाकडे सादर केले नसल्याची गंभीर बाब उघड झाली आहे. 
शासनाने १४ व्या वित्त आयोगाचा निधी थेट ग्रामपंचायतींकडे सुपूर्द करण्याचा महत्वाकांक्षी निर्णय घेतला. सोबतच ग्रामपंचायतींना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी ठोस धोरण देखील आखले आहे. त्यानुसार, ग्रामविकास विभागाने १ फेब्रुवारी २०१६ रोजी राज्यभरातील सर्व ग्रामपंचायतींना पत्र पाठवून १४ व्या वित्त आयोगांतर्गत ‘परफॉर्मन्स ग्रॅन्ट’ देण्याचा महत्वाचा निर्णय घेतला. मात्र, त्यासाठी ग्रामपंचायतींना गत दोन वर्षाच्या आतील कालावधीचे लेखापरिक्षण करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्याशिवाय कुठल्याच ग्रामपंचायतीला ‘परफॉर्मन्स ग्रॅन्ट’ मिळणार नाही. यासह गतवर्षीपेक्षा चालूवर्षी ग्रामपंचायतींच्या स्वउत्पन्नात वाढ होणे देखील अपेक्षित आहे. त्याची जबाबदारी जिल्हा परिषदेचे ग्रामविकास अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. 
असे असले तरी ग्रामपंचायतींना लेखापरिक्षणासंबंधी शासनाने स्पष्ट निर्देश देवूनही १० महिण्याचा मोठा कालावधी उलटून गेल्यानंतरही जिल्ह्यातील ४९१ पैकी एकाही ग्रामपंचायतीने अद्याप लेखापरिक्षणाचा अहवाल जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाकडे सादर केलेला नाही. परिणामी, १४ व्या वित्त आयोगांतर्गत मिळणाºया ‘परफॉर्मन्स ग्रॅन्ट’पासून जिल्ह्यातील बहुतांश ग्रामपंचायती मुकणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 
 
जिल्ह्यातील सर्वच ग्रामपंचायतींना गत दोन वर्षांतील लेखापरिक्षणाचा अहवाल पाठविण्यासंदर्भात वेळोवळी सूचित करण्यात आले आहे. मात्र, त्यास फारसा प्रतिसाद मिळत नाही. -  प्रमोद कापडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, पंचायत विभाग, जि.प., वाशिम