शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

मंगरूळपीर तालुक्यात होणार ६०३४५ हेक्टरवर खरिपाची पेरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:27 IST

मंगरूळपीर : मंगरूळपीर : तालुक्यात यावर्षीच्या खरीप हंगामात ६० हजार ३४५ हेक्टर क्षेत्रावर पीक लागवड होणार आहे. ...

मंगरूळपीर : मंगरूळपीर : तालुक्यात यावर्षीच्या खरीप हंगामात ६० हजार ३४५ हेक्टर क्षेत्रावर पीक लागवड होणार आहे. त्यासाठी बी-बियाणे, खते व इतर शेतीसाहित्य खरेदीसाठी शेतकरी शहरातील व तालुक्यातील ठिकठिकाणच्या कृषी केंद्रांवर धाव घेत आहेत.

तालुक्यात खरीप पीक लागवडीखालील सर्वसाधारण क्षेत्र ६१ हजार ४४३ हेक्टर आहे. परंतु गेल्या काही दिवसांपासून सातत्याने निर्माण होणारे पावसाळी वातावरण, अधूनमधून पडणारा पाऊस, वेळेवर पाऊस पडणार असल्याबाबत तज्ज्ञांनी वर्तविलेले अंदाज यामुळे शेतकऱ्यांनी घाईघाईने पेरणीपूर्व शेती मशागतीची कामे उरकून घेऊन बी-भरणाच्या तयारीला लागले.

तालुक्यात खरीप पिकाच्या लागवडीयोग्य सर्वसाधारण क्षेत्र ६१ हजार ४४३ हेक्टर असून बराच भाग डोंगराळ असल्याने या भागातील शेतजमीन हलकी व मुरमाड आहे. त्यातच सिंचन व्यवस्था नगण्य आहे. त्यामुळे बहुतांश शेती कोरडवाहू असल्याने पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. परंतु मागील दोन वर्षांपासून पावसाचे प्रमाण चांगले राहिल्याने खरिपाच्या क्षेत्रात वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. तालुक्यातील खरीप हंगामात प्रामुख्याने तूर, मूग, उडीद, सोयाबीन व कापूस ही नगदी पिके घेतली जातात. त्याचप्रमाणे हळद, सूर्यफूल व इतर गळीत धान्याची पिके घेतली जातात. तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या नियोजनानुसार यावर्षी पीकनिहाय क्षेत्र प्रस्तावित करण्यात आले आहे. याप्रमाणे तूर ९३२० हेक्टर, मूग ९०८ हेक्टर, उडीद १२३५ हेक्टर, सोयाबीन ४६,५१० हेक्टर आणि कापूस १४३० हेक्टर, तर ज्वारी २३२, ऊस १५, भाजीपाला ४५०, हळद २४५ हेक्टर अशा एकूण ६०३४५ हेक्टरवर खरिपाची पेरणी होणार आहे. गतवर्षी ४६०५० हेक्टर असलेल्या सोयाबीनच्या क्षेत्रात यावर्षी वाढ झाली असून यावर्षी ४६,५१० हेक्टरवर सोयाबीनची पेरणी होणार आहे. मात्र गतवर्षी कपाशीचे पीक समाधानकारक येऊनही ऐनवेळी झालेली अतिवृष्टी व विविध किडींच्या प्रादुर्भावामुळे हाती आलेल्या पिकाचे मोठे नुकसान होऊन शेतकऱ्यांना चांगलाच आर्थिक फटका बसला. त्यामुळे यावर्षी सरकीच्या पेरणीकडे शेतकऱ्यांचा कल कमी दिसत आहे. यंदा कापसाचे क्षेत्र कमी होत आहे, तर दहा तारखेला मुसळधार पाऊस पडल्यामुळे, शेतकऱ्यांनी सध्या पेरणी करू नये, असे आवाहन कृषी विभागाच्यावतीने याआधी करण्यात आले होते. परंतु सध्या पेरणीसाठी योग्य वातावरण असून शेतकऱ्यांनी पेरणी करावी, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी रवींद्र इंगोले यांनी केले आहे.

..........

मंगरूळपीर तालुक्यात सध्या ९९६ मेट्रिक टन खते, तर ३५७ क्विंटल बियाणे उपलब्ध आहेत. सध्या सोयाबीन बियाणाचा तुटवडा असून जवळपास दहा टक्केच शेतकरी वंचित आहेत.

- आर. जी. मोघाड, कृषी अधिकारी, पं. स. मंगरूळपीर