शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

नाफेडच्या दिरंगाईने कोलमडणार खरिपाचे नियोजन !

By admin | Updated: May 16, 2017 01:42 IST

तूर विकल्यानंतरही पैसे मिळण्यास दिरंगाई होत आहे. यामुळे यावर्षी खरीप हंगामाचे नियोजन कोलमडणार असल्याचे शेतकरीवर्गातून बोलले जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमंगरूळपीर : मंगरुळपीर तालुक्यात यावर्षी नाफेड केंद्रावर तुर विक्रीकरिता शेतकऱ्यांना अनेक संकटाशी सामना करावा लागला. एवढेच नव्हे तर ऐन खरीप हंगाम तोंडावर असतांना बहूतांश शेतकऱ्यांकडे तुर पडून असल्यामुळे तर काहींना तूर विकल्यानंतरही पैसे मिळण्यास दिरंगाई होत आहे. यामुळे यावर्षी खरीप हंगामाचे नियोजन कोलमडणार असल्याचे शेतकरीवर्गातून बोलले जात आहे.मंगरुळपीर तालुक्यात तुरीची पेरणी मोठ्या प्रमाणात करण्यात येते. निसर्गाच्या साथीमुळे यावर्षी बहूतांश शेतकऱ्यांना तुर अधिक प्रमाणात झाली. अस्मानी संकट टळले आता सुलतानी संकट येणार नाही अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र नाफेड केंद्र सुरु होण्यापुर्वी शेतकऱ्यांना कमी भावात व्यापाऱ्यांना तुर विकावी लागली. त्यानंतर कसेबसे नाफेड केंद्र सुरु झाले. मात्र सुरुवातीपासून कधी जागेअभावी तर कधी बारदाण्याअभावी नाफेड केंद्रावर तुर मोजण्यासाठी अडचणी येत गेल्या. या दरम्यान शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांना तुर विकली. त्यात तोटा झाला आणि तुर मोजणीचे काम संथगतीने होत गेले. त्यामुळे खरीप पेरणीचा हंगाम तोंडावर आला असतांना अनेक शेतकऱ्यांची तुर नाफेड केंद्रावर मोजणीच्या प्रतिक्षेत पडुन आहे. अशा सुलतानी संकटामुळे यावर्षी खरीप हंगामाचे नियोजन कोलमडणार, असे शेतकरी बोलत आहे. तूरीचे पैसे वेळेवर मिळाले नाही तर खरिप हंगामात शेतीपयोगी व पेरणीयोग्य साहित्य खरेदी कसे करावे? असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला. नाफेडद्वारे आता तूरीची मोजणी सुरू आहे. टोकन घेण्यासाठी शेतकऱ्यांची गर्दी होत आहे. तूर विक्रीनंतर वेळेवर पैसे मिळणेही गरजेचे आहे. मंगरूळपीर बाजार समितीने शेतकऱ्यांसाठी योग्य ती व्यवस्था केली आहे.