शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

खरीप पीक कर्ज विषयक समस्या ‘जैसे थे’!

By admin | Updated: June 18, 2017 01:50 IST

सहायक निबंधकांचे पथक गायब : संपर्क साधूनही मिळेना प्रतिसाद

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: जिल्ह्यातील शेतकर्‍यांना सेवा सहकारी संस्था सोसायटीमार्फत किंवा अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत खरीप पीक कर्ज वाटपाबाबत जाणवणार्‍या समस्या सोडविण्याकरिता सहायक निबंधक सहकारी संस्थेने विशेष पथक नेमले; परंतू थकीत कर्जासह उद्भवलेल्या इतर समस्या आजही ह्यजैसे थेह्ण असून, पथकातील अधिकारी, कर्मचार्‍यांची शेतकर्‍यांच्या प्रश्नांना उत्तरे देताना दमछाक होत आहे. सन २0१७-१८ च्या खरीप हंगामाकरिता जिल्ह्यातील कोणताही पात्र शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहणर नाही, याची काळजी घेण्यात येत असून, मे अखेरपर्यंंंत पीक कर्ज वाट पाचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकर्‍यांनी मे अखेरपर्यंंंत पीक कर्ज घेण्याबाबत तत्काळ संबंधित सेवा सहकारी संस्थेचे गट सचिव यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करत तत्कालीन जिल्हा उपनिबंधक ज्ञानेश्‍वर खाडे यांनी पीक कर्जविषयक समस्या सोडविण्याकरिता विशेष पथक गठित केले होते. त्यानुसार, जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील दूरध्वनी क्रमांकासह जी.बी. राठोड एम. जे. भेंडेकर, वाशिम सहायक निबंधक कार्यालयातील दूरध्वनी क्रमांक, बी.ए. कोल्हे, रिसोड सहायक निबंधक कार्यालयातील दूरध्वनी क्रमांक, आर.आर. सावंत, मालेगाव सहायक निबंधक कार्यालयातील दूरध्वनी क्रमांक, पी.टी. सरकटे, मंगरूळपीर सहायक निबंधक कार्यालयातील दूरध्वनी क्रमांक, पी.एन. गुल्हाणे, कारंजा सहायक निबंधक कार्यालयातील दूरध्वनी क्रमांक, डी.डी. दारमोडे मानोरा सहायक निबंधक कार्यालयातील दूरध्वनी क्रमांक अथवा आर.बी. राठोड यांच्या भ्रमणध्वनी क्रमांकांवर शेतकर्‍यांनी संपर्क साधण्याचे आवाहन केले होते. सोबतच संबंधित सर्व दुरध्वनी आणि भ्रमणध्वनी क्रमांकही जाहीर करण्यात आले; मात्र जिल्हा उपनिबंधकांचा हा सकारात्मक प्रयोग पूर्णत: फसला आहे. शेतकर्‍यांना कर्ज मिळणेदेखील मुश्कील झाले असून, ज्या शेतकर्‍यांना कर्ज मिळाले, त्यांची रक्कम बँकेत पडून आहे, कर्जमाफीचा निर्णय अद्याप शासनस्तरावर प्रलंबित असून, १0 हजार रुपये तातडीच्या कर्जासाठीदेखील बँका नकार दर्शवित आहेत. यासह इतरही प्रश्न सद्या गंभीर झाले असताना ते निकाली काढण्याकरिता कुठलेच पथक कामी पडत नसल्याचे शेतकर्‍यांचे म्हणणे आहे.