शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

‘खाकी’ची रोगप्रतिकारशक्ती वाढली; दुसऱ्या लाटेत कोरोनावर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:43 IST

जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाचे संकट दिवसागणिक गंभीर होत चालले आहे. फेब्रुवारीअखेर कोरोनाबाधित रुग्णांचा एकूण आकडा ८ हजार ९३४ होता. ...

जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाचे संकट दिवसागणिक गंभीर होत चालले आहे. फेब्रुवारीअखेर कोरोनाबाधित रुग्णांचा एकूण आकडा ८ हजार ९३४ होता. मात्र, त्यानंतर सातत्याने रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक वाढच होत गेली. २० मे अखेर हा आकडा ३७ हजार २७७ वर पोहोचला आहे. दरम्यान, कोरोना संसर्गाच्या पहिल्या लाटेत अर्थात २५ फेब्रुवारी २०२१ पूर्वी ३० अधिकारी आणि २९९ अंमलदार अशा एकूण ३२९ जण कोरोनाबाधित झाले होते. त्यापैकी एका अंमलदाराचा मृत्यू झाला; तर १५ फेब्रुवारी ते १९ मे २०२१ या कालावधीत १४ अधिकारी आणि २०६ अंमलदार अशा एकंदरीत २२० जणांना कोरोनाची बाधा झाली. त्यातील १२ जणांवर सध्या उपचार सुरू असून २०८ जण कोरोनामुक्त झाले आहेत. दुसऱ्या लाटेत कोणाचाही सुदैवाने मृत्यू झाला नाही.

....................

पहिली लाट

एकूण रुग्ण - ७३३९

पोलीस - ३२९

एकूण मृत्यू - १५६

पोलीस मृत्यू - ०१

.............................

दुसरी लाट

एकूण रुग्ण - २९९३८

पोलीस - २२०

एकूण मृत्यू - २२८

पोलीस मृत्यू - ००

............................

बाॅक्स :

प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी दैनंदिन व्यायाम, प्राणायाम

पोलीस दलातील अधिकारी, कर्मचाऱ्यांवर जनतेच्या रक्षणाची जबाबदारी असते. त्यामुळे त्यांना सदैव ‘फिट अँड फाईन’ राहावे लागते. ही जाणीव ठेवून कोरोनाची बाधा होऊनही त्यातून अनेक अधिकारी, कर्मचारी अल्पावधीतच सुरक्षितरीत्या बाहेरही आले. दैनंदिन व्यायाम, प्राणायाम, फळांच्या ज्यूसचे प्राशन करण्याचा फायदा झाल्याचे काहींनी सांगितले.

.....................

कोट :

कोरोना विषाणू संसर्गाच्या संकटाने संपूर्ण जिल्ह्याला आपल्या कवेत घेतले आहे. समाजाचाच एक भाग असलेले पोलीस तरी त्यातून कसे सुटणार? वर्षभरात ५४० अधिकारी व अंमलदार कोरोना बाधित झाले; मात्र आज रोजी ५२७ जणांनी कोरोनावर मात केली आहे.

- श्रीराम घुगे

निरीक्षक, डीएसबी ब्रँच

............

सकाळ-सायंकाळच्या सुमारास मैदानावर हजर राहून शारीरिक कसरती करणाऱ्या पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना कोरोना संसर्गाची बाधा झाली. मात्र, त्यातून ते यशस्वीरीत्या बाहेरही पडले. सततच्या व्यायामामुळे त्यांच्यावर जीवघेणे संकट ओढवले नाही, ही बाब दिलासा देणारी ठरली.

- शिवाजी ठाकरे

निरीक्षक, एलसीबी ब्रँच

..............

वर्षभरापेक्षा अधिक कालावधीपासून कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनांची पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून चोख अंमलबजावणी केली जात आहे. यादरम्यान पहिल्या लाटेत ३२९ व दुसऱ्या लाटेत २२० अधिकारी, कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली. त्यातील एकाचा मृत्यूही झाला. इतर जवानांनी मात्र यशस्वीरीत्या कोरोनावर मात केली आहे.

- वसंत परदेशी

जिल्हा पोलीस अधीक्षक, वाशिम