शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

खडसे यांना राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार

By admin | Updated: March 22, 2017 02:59 IST

व्यसनमुक्ती क्षेत्रातील उल्लेखनीय योगदान व कार्याबद्दल राज्यस्तरीय महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार.

वाशिम, दि.२१- तालुक्यातील उमरा शम. येथील शाहीर संतोष खडसे यांना व्यसनमुक्ती क्षेत्रातील उल्लेखनीय योगदान व कार्याबद्दल शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्यावतीने राज्यस्तरीय महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्काराने १९ मार्च रोजी सन्मानित करण्यात आले. अमरावती येथील संत ज्ञानेश्‍वर सांस्कृतिक भवनात पार पडलेल्या देशातील पाचव्या राज्यस्तरीय व्यसनमुक्ती साहित्य संमेलन आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार वितरण सोहळ्यात संतोष खडसे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटन सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी केले. उद्योग आणि खनिकर्म, पर्यावरण, सार्वजनिक बांधकाम मंत्री व अमरावतीचे पालकमंत्री प्रवीण पोटे, संमेलनाध्यक्ष राष्ट्रीय प्रबोधनकार व सप्तखंजेरीवादक सत्यपाल महाराज, सिने अभिनेत्री डॉ. निशिगंधा वाड, मावळत्या संमेलनाध्यक्ष मुक्ता पुणतांबेकर, समाज कल्याण विभागाचे आयुक्त पीयूष सिंह, माजी आयुक्त आर. के. गायकवाड, जिल्हाधिकारी किरण गीते, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी, उपायुक्त भीमराव खंडाते, प्रादेशिक उपायुक्त दीपक वडकुते, महानगरपालिका आयुक्त हेमंतकुमार पवार, सामाजिक न्यायमंत्र्यांचे प्रतिनिधी फडणवीस, सहायक उपायुक्त तथा वाशिमचे समाजकल्याण अधिकारी अमोल यावलीकर आदींच्या उपस्थितीत संतोष खडसे यांना सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, धनादेश, शाल, श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी संतोष खडसे यांच्या पत्नी रेखा खडसे, कवी जनार्दन भालेराव, सदानंद इंगोले आदींची उपस्थिती होती.