शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

कारखेडा जि. प. शाळेची यशोगाथा राज्यस्तरावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:43 IST

मानोरा : महाराष्ट्र शैक्षणिक नियोजन व प्रशासन संस्था (मिपा), औरंगाबाद यांच्यावतीने उत्कृष्टतेचा ध्यास घेऊन काम करणाऱ्या महाराष्ट्रातील काही ...

मानोरा : महाराष्ट्र शैक्षणिक नियोजन व प्रशासन संस्था (मिपा), औरंगाबाद यांच्यावतीने उत्कृष्टतेचा ध्यास घेऊन काम करणाऱ्या महाराष्ट्रातील काही निवडक शाळांच्या केस स्टडीज्‌चे संकलन करण्यात आले आहे. वाशिम जिल्ह्यातून दोन शाळांची निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये मानोरा तालुक्यातील जि. प. शाळा कारखेडा या शाळेची निवड करण्यात आली आहे.

यावर्षी महाराष्ट्र शैक्षणिक नियोजन व प्रशासन संस्था (मिपा), औरंगाबादच्यावतीने एक अभिनव संकल्पना राबविण्यात आली आहे. त्या संकल्पनेतून महाराष्ट्रातील काही शाळा या उत्कृष्टतेचा ध्यास घेऊन काम करतात. जसे की, या शाळा जीवन जगण्याची कला शिकवितात. लोकवर्गणीतून शंभर टक्के डिजिटल होणाऱ्या शाळा, अभिनव उपक्रम राबविणाऱ्या शाळा... अशा शाळांना प्रोत्साहन म्हणून व राज्यातील इतर शाळांना एक आदर्श म्हणून ओळख व्हावी, यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातून दोन शाळांची निवड करण्यात आली आहे. त्यात जि. प. शाळा कारखेडा या शाळेची यशोगाथा राज्यस्तरीय पुस्तिका 'शाळेची यशोगाथा'मध्ये प्रकाशित होणार आहे. ही मानोरा तालुक्यासाठीच नव्हे, तर जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब आहे. या शाळेला प्रगतिपथावर नेण्यासाठी गावातील नागरिकांनी मोठा लोकसहभाग उपलब्ध करून दिला तथा डायट वाशिमची टीम व मानोरा पंचायत समितीचे गटशिक्षणधिकारी अनिल पवार, केंद्रप्रमुख अशोक ठाकरे, गावाच्या सरपंच सोनाली बबनराव सोळंके, जि. प.चे मुख्याध्यापक गोविंद पोतदार, शिक्षक रणजित जाधव, शिक्षिका कविता चौधरी यांचा मोलाचा वाटा आहे.

शाळेच्या प्रत्येक उपक्रमात गावाच्या नागरिकांचा सहभाग हा मोठ्‌या प्रमाणात राहतो. त्यामुळेच आम्हाला काम करण्याची प्रेरणा मिळाली.

- गोविंद पोतदार, मुख्याध्यापक, जि. प. शाळा, कारखेडा