शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

खरेदी-विक्रीचे व्यवहार ठप्प!

By admin | Updated: November 14, 2016 02:43 IST

‘चोरी-छुपे’ चालणा-या व्यवहारांवर बसला अंकुश; ५00, १000 च्या नोटा रद्दचा परिणाम.

वाशिम, दि. १३- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवार, ८ नोव्हेंबरपासून चलनातून ५00 आणि १000 रुपयांच्या नोटा रद्द झाल्याचा निर्णय जाहीर केला. त्याचा परिणाम इतर क्षेत्रांवर होण्यासोबतच मालमत्ता खरेदी-विक्रीचे व्यवहारही पूर्णत: ठप्प झाले आहेत. जिल्हय़ात ९ ते ११ नोव्हेंबरदरम्यान बोटावर मोजण्याइतपतच व्यवहार झाल्याची माहिती समोर आली आहे. दैनंदिन व्यवहारात वापरला जाणारा काळा पैसा कायमचा हद्दपार व्हावा, या मूळ हेतूने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनपेक्षितपणे ५00 आणि १000 रुपयांच्या नोटा रद्द ठरविण्याचा निर्णय मंगळवारी रात्री ८ वाजता जाहीर केला. या निर्णयाचे दुरगामी परिणाम अत्यंत फायदेशीर असले तरी तूर्तास सर्वांनाच अचानकपणे झालेल्या बदलाचा जबर फटका बसत असल्याचे दिसून येत आहे. शेतजमीन, बांधलेले पक्के घर, रिकामे प्लॉट यासह इतर स्थावर मालमत्ता खरेदी-विक्रीच्या व्यवहारातून जिल्हय़ात दैनंदिन कोट्यवधी रुपयांची उलाढाल चालत असे. काही महिन्यांपूर्वी थोडीथोडकी रक्कम देऊन ह्यइसारचिठ्ठीह्ण करणार्‍या अनेकांच्या खरेदीचा व्यवहार नोव्हेंबर २0१६ महिन्यात होऊ घातला होता; मात्र बुधवारपासून ५00 आणि १000 रुपयांच्या नोटा चलनातून गायब झाल्याने रोखीचा व्यवहार जवळपास अशक्य ठरला आहे. रद्द झालेल्या या नोटा स्वीकारायला कुणी तयार नाही आणि मोठय़ा रकमेचा ह्यविड्रॉलह्ण द्यायला बँका तयार नाहीत, अशा द्विधा संकटात मालमत्ता खरेदी-विक्रीचे व्यवहार अडकले आहेत. आमच्या ठिकठिकाणच्या प्रतिनिधींकडून मिळालेल्या माहितीनुसार, वाशिममध्ये दिवसाला मालमत्ता खरेदी-विक्रीची साधारणत: १५ प्रकरणे निकाली काढली जात होती. या माध्यमातून सुमारे ८0 लाख ते १ कोटीपर्यंत व्यवहार व्हायचे. ५00 आणि १000 रुपयांच्या नोटा बंद झाल्यानंतर ९ ते ११ नोव्हेंबरदरम्यान मात्र हे प्रमाण दैनंदिन ४ ते ५ प्रकरणांवर येऊन ठेपले असून मालमत्ता विक्री करणार्‍यांच्या तुलनेत खरेदी करणार्‍यांचे प्रमाण घटले आहे.