याप्रसंगी जिल्ह्यातील सर्व गोशाळा संस्थाचालक तसेच गोसेवक यांची उपस्थिती होती. यावेळी गोशाळा महासंघ महाराष्ट्र राज्य कार्यकारणीचे पदाधिकारी डॉ. सुनील सूर्यवंशी यांनी मार्गदर्शन केले. भारतात १५ राज्यातील गोशाळांना अनुदान दिले जाते ,महाराष्ट्र सरकार गोशाळेला अनुदान देत नाही, त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व गोशाळा ट्रस्टला शासनाने अनुदान द्यावे अशी मागणी सरकारकडे करणार असल्याचे सांगितले. सरकारने जर अनुदान दिले नाही तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा डॉ. सूर्यवंशी यांनी यावेळी दिला.
सभेत जिल्हा कार्यकारिणीची निवड
या सभेमध्ये वाशिम जिल्हा कार्यकारिणी गोशाळा संघटनेच्या समितीची निवड करण्यात आली. यामध्ये जिल्हा गोशाळा संघटनेच्या अध्यक्षपदी देविदास पाटील राऊत याची तर सचिवपदी गजानन अवताडे यांची निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी संतोष बियाणी,प्रवीण पटेल व श्यामबाबू मुंदडा यांची निवड करण्यात आली. सहसचिवपदी गजानन वाघ,प्रसिद्धीप्रमुखपदी दिलीप मुंदडा मालेगाव,सदस्यपदी नितीन भोयर,गजानन आढाव,मधुकर डेरे,पाकधने महाराज,जोगदंड दत्तप्रभू महाराज यांची निवड करण्यात आली.