शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

मजूरांच्या ‘जॉब कार्ड’बाबत लवकरच घेतला जाणार आढावा! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2017 13:24 IST

 वाशिम - महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत मजूरांना देण्यात येणारे जॉब कार्ड हे ग्राम पंचायतमध्ये ठेवण्यास सक्त मनाई आहे. तथापि, अद्यापही ग्राम पंचायतमध्येच जॉब कार्ड ठेवले जात असल्याचे प्रकार समोर येत आहेत. या पृष्ठभूमीवर जॉब कार्डसंदर्भात आढावा घेऊन ग्राम पंचायतमध्ये जॉब कार्ड न ठेवण्याच्या सूचना सर्वांना दिल्या जाणार ...

ठळक मुद्देरोजगार हमी योजना : जिल्हा प्रशासनाचे नियोजन

 

वाशिम - महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत मजूरांना देण्यात येणारे जॉब कार्ड हे ग्राम पंचायतमध्ये ठेवण्यास सक्त मनाई आहे. तथापि, अद्यापही ग्राम पंचायतमध्येच जॉब कार्ड ठेवले जात असल्याचे प्रकार समोर येत आहेत. या पृष्ठभूमीवर जॉब कार्डसंदर्भात आढावा घेऊन ग्राम पंचायतमध्ये जॉब कार्ड न ठेवण्याच्या सूचना सर्वांना दिल्या जाणार आहेत. 

बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टिकोनातून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी  योजना सुरू करण्यात आली आहे. रोजगार मिळण्यासाठी मजूरांना नोंदणी करावी लागते. नोंदणीकृत मजूरांना जॉब कार्ड मिळाल्यानुसार, त्यानुसार काम उपलब्ध करून दिले जाते. किती दिवस काम केले, मजूरी किती यासह अन्य माहिती जॉब कार्डवर ठेवून या योजनेत पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न शासनातर्फ करण्यात आला. मजुरांना दिलेली जॉब कार्ड ही मजुरांकडे ठेवण्याबाबतची तरतुददेखील करण्यात आलेली आहे. असे असतानादेखील ग्राम पंचायतमध्ये जॉब कार्ड ठेवण्याचे प्रकार समोर येत असल्याने आता शासनाने प्रशासनाला यासंदर्भात सक्त सूचना देत तपासणी करण्याचे फर्मान सोडले आहे.

मजुरांना देण्यात आलेली जॉब  कार्ड ग्राम पंचायत कार्यालयास ठेवल्यास त्यामध्ये बºयाच अडचणी निर्माण होवू शकतात तसेच मजुरांना त्यांनी किती दिवस काम केले व किती मजुरी मिळाली याबाबतची माहिती मिळू शकत नाही. या पृष्ठभूमीवर आता कोणत्याही परिस्थितीत ग्राम पंचायतमध्ये जॉब कार्ड राहू नये, यासाठी नियोजन करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला मिळाल्या आहेत. या सूचनाच्या अनुषंगाने जिल्हयाचा आढावा घेउन या कार्यक्रमाअंतर्गत मजुरांना दिलेली जॉब कार्ड ही ग्राम पंचायत कार्यालयात ठेवली असल्यास ती संबंधित मजुरांकडे तात्काळ देण्यात यावी तसेच यापुढे ग्रामपंचायतीमध्ये कोणत्याही मजुराचे जॉबकार्ड राहणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना ग्रामपंचायत प्रशासनाला दिल्या जाणार आहेत.