वाशिम: आपल्या आजोबाकडे शिक्षण घेण्यासाठी आलेल्या एका १६ वर्षीय मुलीला तिच्या मेहुण्याने फूस लावून पळविले. ही घटना २९ जानेवारीला घडली असून, ३१ जानेवारीला फिर्याद नोंदविण्यात आली. हिंगोली जिल्हय़ातील जवळा बु. येथील १६ वर्षीय मुलगी आपल्या आजोबाकडे वाघोली बु. ता.जि. वाशिम शिक्षण घेण्यासाठी आली होती वाशिम येथील पंचशील नगरमध्ये वास्तव्यास असलेल्या तिचा मेहुणा रवी भानुदास लांडगे हा २९ जानेवारीला गावामध्ये आला व त्याने पीडित मुलीला लग्नाचे आमिष दाखवू फूस लावून पळवून नेले. या घटनेची फिर्याद पीडित मुलीच्या आईने वाशिम ग्रामीण पो.स्टे. ला दिली. पोलिसांनी जावई रवी लांडगे याच्या विरुद्ध भादंविच्या ३६३, ३६६ अन्वये गुन्हा दाखल केला.
जावयाने मेहुणीला फूस लावून पळविले!
By admin | Updated: February 2, 2016 01:53 IST