शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
3
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
4
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
5
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
6
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
7
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
8
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
9
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
10
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
11
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
12
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
13
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
14
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
15
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
16
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
17
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
18
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
19
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
20
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"

जावयाने केली सासरवाडीत आत्महत्या

By admin | Updated: November 14, 2015 02:20 IST

रिसोड तालुक्यातील लेहणी गावातील घटना

रिसोड (जि. वाशिम): दिवाळी सणानिमित्त सासरवाडीत आलेल्या जावयाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना भाऊबीजलाच रिसोड तालुक्यातील लेहणी शेतशिवारात दुपारी अडीच वाजताच्या दरम्यान उघडकीस आली.ज्ञानेश्‍वर लक्ष्मण शेजुळ (४२) असे मृतकाचे नाव असून, ते तालुक्यातील गोहगाव दांदडे येथील रहिवासी होते. याविषयी प्राप्त माहितीनुसार, ज्ञानेश्‍वर शेजुळ यांचे दोन विवाह झाले आहेत. दुसर्‍या पत्नीसोबत ते गोहगाव दांदडे येथे वास्तव्यास होते. मोलमजुरी करून कुटुंबाची जबाबदारी सांभाळत असताना, आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने दैनंदिन परिस्थितीचा सामना करताना ते हतबल झाले होते. यातूनच हा घटनाक्रम घडल्याचे बोलले जात आहे. पहिल्या पत्नीची दोन मुले व मुलगी, तर दुसर्‍या पत्नीचा मुलगा यांच्यासह सहा सदस्यांचे हे कुटुंब हे गोहगाव येथे एकत्र राहत होते. पहिल्या पत्नीच्या तिन्ही मुलांना मामाच्या गावी, सासरवाडीत लेहणी येथे दिवाळीनिमित्त ज्ञानेश्‍वर शेजुळ घेऊन आला होता. लेहणी येथीलच शेतशिवारातील ज्ञानबा हुले यांच्या शेतात भाऊबीजच्या दिवशी दुपारी झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. ज्ञानेश्‍वर शेजुळ यांची परिस्थिती अतिशय हलाखीची असून, अशातच त्यांच्या अचानक जाण्याने पत्नी व मुलांवर जणू आभाळच कोसळल्यासारखे मोठे दु:ख उभे ठाकले आहे. परिसरातील नागरिकांनी त्यांचे दु:ख पाहून शोक व्यक्त केला आहे.