शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
2
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
3
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
4
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
5
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
6
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
7
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
8
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
9
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
10
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
11
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
12
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
13
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
15
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
16
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
17
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
18
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
19
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
20
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
Daily Top 2Weekly Top 5

जनता कर्फ्यूला मालेगावात १०० टक्के प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2020 16:28 IST

२२ मार्च रोजी ‘जनता कर्फ्यू’ला मालेगाव शहर व तालुक्यात १०० टक्के प्रतिसाद मिळाला.

मालेगाव : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्याकरिता २२ मार्च रोजी ‘जनता कर्फ्यू’ला मालेगाव शहर व तालुक्यात १०० टक्के प्रतिसाद मिळाला.जनता कर्फ्युकरिता मालेगाव शहरातील सर्व नागरिकांनी शनिवारपासूनच स्वयंफूर्तीने बंद पाळण्याचे आवाहन केले होते. त्या आवाहनाला प्रतिसाद देत रविवारी सकाळपासूनच मालेगाव शहरात शुकशुकाट पाहायला मिळाला. मालेगाव शहरात सकाळी सात वाजतापासून सर्वत्र सामसूम दिसून आली. एकही मनुष्य रस्त्यावर फिरकला नाही. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सगळीकडे पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. रस्त्यावर कुणी आढळले तर पोलिसानी त्यांना घरी जाण्यास सांगितले. दिवसभर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला. सायंकाळी पाच वाजता अनेक लोक आपल्या घरासमोर गच्चीवर तसेच बाल्कनीमध्ये येऊन टाळ्या वाजून वाद्य वाजवून जनता कर्फ्यूला प्रतिसाद दिला. कुणीही घराबाहेर न पडल्याने मालेगाव शहरात सर्वत्र  शांतता पाहावयास मिळाली. जनता कर्फ्यूच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दाखवित रविवारी व्यापाºयांनी स्वयंस्फुर्तीने सर्व दुकाने बंद ठेवली. ग्रामीण रुग्णालय तसेच काही खासगी हॉस्पीटल सुरू होते. ग्रामीण भागात सुद्धा कुणीही शेतात गेले नाही तर अनेक ठिकाणी जनावरसुद्धा बाहेर चरायला नेली नाहीत. डॉ. निलेश मानधने यांनी मालेगाव शहरातील अत्यंत तातडीची गरज असलेल्या रुग्णांकरीता रविवारी मोफत रुग्णवाहिका व डॉक्टरची सोय केली. त्यांच्या या रुग्ण सेवेचे सर्वत्र कौतुक झाले.

टॅग्स :washimवाशिमcorona virusकोरोना वायरस बातम्या