वाशिम: ङ्म्री स्वामी सर्मथ महाराज मंदिर अकोला रोड येथे गुरूपोर्णिमेनिमित्त स्वामींच्या दर्शनासाठी जनसागर उसळला होता. याप्रसंगी आयोजित महाप्रसाद कार्यक्रमाचा शेकडो भाविकांनी लाभ घेतला. यावेळी विविध धार्मीक कार्यक्रम उत्साहात घेण्यात आले.ङ्म्री स्वामी सर्मथ महाराज मंदिरात सकाळी ७ वाजता स्वामीस अभिषेक करण्यात आला. यानंतर सकाळी ८ वाजता व दुपारी १२.३0 आरती करण्यात येवून महाप्रसाद कार्यक्रमास सुरूवात करण्यात आली. महाप्रसादास जनसागर उसळला होता. अतिशय शिस्तबध्द पध्दतीने भारतीय पध्दतीनुसार पंगत देवून महाप्रसाद कार्यक्रमाचे वाटप करण्यात आले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ङ्म्री स्वामी सर्मथ सेवा समितीने अथक परिङ्म्रम घेतले. यानंतर रामरक्षा पाठ व जप, संध्याकाळी ७.३0 वाजता आरती झाली. दुपारी १२.३0 वाजता सुरू झालेला प्रसाद उशिरा पर्यंत रात्री सुरू होता. या मंदिरावर दर गुरूवारी भाविकांच्यावतिने प्रसाद वाटप कार्यक्रम संध्याकाळी ६ वाजता असतो याचा लाभ भाविकांनी घेण्याचे आवाहनही सेवा समितीच्यावतिने करण्यात आले आहे.
स्वामीं सर्मथांच्या दर्शनासाठी जनसागर
By admin | Updated: July 12, 2014 23:08 IST