शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

जानोरीत वीज कोसळली; जीवितहानी नाही

By admin | Updated: June 11, 2017 02:15 IST

सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी नाही; पिंपळाचे झाड जळाले.

लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा लाड: तालुक्यातील जानोरी येथे सायंकाळी ६ वाजताच्या दरम्यान पावसाने हजेरी लावली. यादरम्यान गावातील प्रकाश लुंगे यांच्या घरावर वीज पडली. सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही; मात्र घराशेजारी असलेल्या पिंपळाचे झाड जळाले. दरम्यान, घरात असलेले प्रकाश लुंगे (५0) व विठ्ठल लुंगे (१८) यांना वीज पडल्यामुळे अंगात मुंग्या आल्यासारख्या वाटू लागल्याने रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. वीज पडल्याने घरातील भांड्याचीसुद्धा पडझड झाली. शेलूबाजार येथे संततधार !शेलूबाजार: शेलूबाजार परिसरात १0 जून रोजी सायंकाळी ६ वाजताच्या दरम्यान वादळासह विजेच्या कडकडात संततधार पाऊस झाला. पहिल्याच पावसाने अडाण नदीला पूर आला तर शेलूबाजार चौक जलमय झाला. दमदार पावसाने शेतकरी सुखावला आहे. शेलूबाजारात सव्वा तास संततधार पाऊस झाल्याने सर्व चौक झाले जलमय होते. नागरी वस्तीत पाणी शिरल्याने नागरिकांची एकच धांदल उडाली. चौकातील अनेक प्रतिष्ठानात पुराचे पाणी घुसले. सायंकाळी ५:३0 वाजताचे सुमारास सुरू झालेल्या संततधार पावसाने जनजीवन विस्कळीत केले. अडाण नदीला पूर गेल्याने शेतकर्‍यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. आठवडी बाजारातील पुलावरून पाणी वाहल्याले काही तास रस्ता बंद झाला होता. दरम्यान, वाशिम शहरातही दुपारच्या सुमारास पाऊस झाला.