गावात लोकसहभागातून सुरू असलेल्या डिजिटल शाळांबाबत माहिती जाणून घेतली. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राचीसुद्धा संपूर्ण दवाखान्याची पाहणी केली. ओपीडीसंदर्भात कोरोना रुग्णांबाबत मेडिसीन स्टॉकबद्दल माहिती घेऊन समाधान व्यक्त केले. यानंतर, नरसिंह माध्यमिक विद्यालयाची पाहणी केली. शिक्षकांसोबत चर्चा करून समाधान व्यक्त केले. यावेळी ग्रामपंचायत ग्रामविकास अधिकारी बनोरे, पंचायत विभागातील विस्तार अधिकारी घुगे, सरपंच नितेश चक्रे, उपसरपंच गजानन दहापुते, ग्रा. सदस्य सौ. सुनीता घाटे, सौ. सुप्रिया ढेंबरे, माजी उपसरपंच इकबाल खान, बंडूभाऊ लहानकर, संपूर्ण ग्रामपंचायत सदस्य व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते. जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापक चव्हाण व संपूर्ण जिल्हा परिषद शिक्षकवर्ग हजर होते. आरोग्य अधिकारी खंडारे, नरसिंह विद्यालयाचे उजवणे, झडपे, वाघ आदींची उपस्थिती होती.
जंगम यांची धामणी ग्रा.पं.ला भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:43 IST