शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

शोभायात्रेत ‘जय सेवालाल’चा गजर!

By admin | Updated: July 7, 2017 01:09 IST

आसेगाव (पो.स्टे.) : दरवर्षी आषाढी एकादशीनिमित्त जालना जिल्ह्यातील गुलखंड व वाटुर तांडा येथून बंजारा समाजबांधव पायदळ वारी करीत बंजारा समाजबांधवांची काशी श्रीक्षेत्र पोहरादेवी येथे दाखल होतात.

लोकमत न्यूज नेटवर्कआसेगाव (पो.स्टे.) : दरवर्षी आषाढी एकादशीनिमित्त जालना जिल्ह्यातील गुलखंड व वाटुर तांडा येथून बंजारा समाजबांधव पायदळ वारी करीत बंजारा समाजबांधवांची काशी श्रीक्षेत्र पोहरादेवी येथे दाखल होतात. ६ जुलै रोजी परिसरातील धानोरा खुर्द, कासोळा येथे पायदळ वारीचे स्वागत करण्यात आले. ‘जय सेवालाल’च्या गजराने नगरी दुमदुमली होती.जालना जिल्ह्यातील गुलखंड व वाटुर तांडा येथील बंजारा समाजबांधव दरवर्षी आषाढी एकादशीनिमित्त माता जगदंबा देवी मंदिर संस्थान पोहरादेवी येथे दर्शनासाठी मोठ्या संख्येने जातात. यावर्षी २७ जून रोजी गुलखंड व वाटुर तांडा येथून पायदळी वारी पोहरादेवी संस्थानकडे मार्गस्थ झाली. ‘जय सेवालाल’चा गजर करीत रिसोड मार्गे ही पायदळी वारी ६ जुलै रोजी आसेगाव परिसरातील ग्राम धानोरा खुर्द, कासोळा, बिटोडा भोयर, फाळेगाव, शेंदुरजना अढाव येथे पोहोचली. प्रत्येक गावात या शोभायात्रेचे भावपूर्ण स्वागत करण्यात आले. धानोरा खुर्द येथे प्राध्यापक मंगेश धानोरकर, दिनेश चव्हाण, वीरसिंग राठोड, पृथ्वीराज चव्हाण, राजूसिंग राठोड यांनी या शोभायात्रेचे स्वागत केले. ९ जुलै रोजी ही शोभायात्रा पोहरादेवी येथे पोहोचणार आहे. ५ जुलै रोजी या शोभायात्रेचा मुक्काम धानोरकर आदर्श माध्यमिक विद्यालय धानोरा खुर्द येथे होता. ६ जुलै रोजी ही शोभायात्रा पोहरादेवीकडे मार्गस्थ झाली.