मानोरा : येथील अरूणावती नदीच्या तिरावर जागृत असे गणपती मंदिर आहे. या ठिकाणी दर्शनाकरिता भाविकांची नेहमीच गर्दी दिसून येते. फार पुरातन अशा गणपती मंदिराचे नवीन आकर्षक स्वरूपात बांधकाम असून भक्तांना नेहमीच पावणारा देव म्हणून या गणपतीची ख्याती आहे. उ त्सवाच्या काळात आरती, भजन, पूजन व महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडतो. अतिशय रम्य अशा ठिकाणी हे देवस्थान असल्याने भक्तगण या मंदिर ठिकाणी आश्रय घेतात. अनेक भक्त श्रींच्या नावाने उपवास व आराधना करतात. तसेच बारही माहे नियमित दोन वेळा पूजा, आरती, नियुक्त केलेल्या पुजारी यांचेद्वारे पार पाडल्या जाते.
मानोरा येथील जागृत गणपती मंदिर
By admin | Updated: September 5, 2014 23:58 IST