शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

वृक्ष लागवडीविषयी चित्ररथाद्वारे होणार जनजागृती

By admin | Updated: June 13, 2017 19:57 IST

वनविभागाची तयारी: जिल्हाधिकाऱ्यांनी दाखविली हिरवी झेंडी

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: पन्नास कोटी वृक्ष लागवड कार्यक्रम अंतर्गत १ ते ७ जुलै २०१७ या कालावधीत राज्यात ४ कोटी वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. याबाबत जनजागृती करण्यासाठी वन विभागाने तयार केलेल्या चित्ररथाला आज जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी हिरवी झेंडी दाखविली.याप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील, अपर जिल्हाधिकारी डॉ. नंदकुमार बेडसे, उपवनसंरक्षक वि. ग. माने, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, रोहयोचे उपजिल्हाधिकारी सुनील कोरडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रकाश पाटील, जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल खंडागळे, सहाय्यक वन संरक्षक आर. बी. गवई, सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी के. आर. राठोड, जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद कोपर्डे आदी उपस्थित होते.वाशिम जिल्ह्याला ५ लक्ष ८ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट प्राप्त झाले आहे. या अनुषंगाने ५ लक्ष २२ हजार वृक्ष लागवडीचे नियोजन करण्यात आले आहे. या अभियानात जास्तीत जास्त लोकसहभाग वाढविण्यासाठी वन विभागाच्यावतीने चित्ररथ तयार करण्यात आला आहे. २५ जून पर्यंत हा चित्ररथ जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये जाणार असून यासोबत असलेल्या कलापथकाच्या माध्यमातून झाडांचे महत्त्व पटवून दिले जाणार आहे. तसेच वृक्ष लागवड मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले जाणार आहे.वृक्ष लागवडीत सहभागी होणाऱ्या ग्रामपंचायतींचा होणार सन्मानपन्नास कोटी वृक्ष लागवड कार्यक्रम अंतर्गत १ ते ७ जुलै २०१७ या कालावधीत राज्यात ४ कोटी वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. या मोहिमेत सहभाग नोंदवून आपल्या आपल्या लोकसंख्ये इतकी वृक्ष लागवड करणाऱ्या जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना स्वातंत्र्य दिनादिवशी सन्मानित करण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील जास्तीत जास्त ग्रामपंचायतींनी यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.