शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

दहा लाख बँकेत भरणारे आयटीच्या रडारवर

By admin | Updated: January 12, 2017 02:19 IST

दोन अधिकार्‍यांची नेमणूक केली असून, उत्पन्नाच्या स्रोताची चौकशी होणार आहे.

संजय खांडेकरअकोला, दि. ११- नोटाबंदीनंतर जुन्या, हजार-पाचशेच्या नोटा, दहा लाखांच्यावर बँक खात्यात जमा करणारे सर्व आयटीच्या रडारवर आहेत. अकोल्यातही शेकडोंच्या संख्येत असे खातेदार समोर आल्याने त्यांची चौकशी लवकरच सुरू होणार असल्याचे संकेत आहेत. आयकर विभागाने अकोल्यातीलच दोन अधिकार्‍यांना या कारवाईसाठी विशेष अधिकार प्रदान करीत त्यांची नेमणूक केली आहे.हजार-पाचशे रुपयांच्या जुन्या नोटा ८ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून बंद करण्यात आल्यात. पेट्रोल पंप आणि मेडिकल स्टोअर्सवर काही दिवस या जुन्या नोटा स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू होती. काळा पैसा ठेवणार्‍या अनेकांनी यादरम्यान विविध उपाययोजना केल्यात. दरम्यान, शासनाने पन्नास दिवसांची मुदत संपुष्टात आणली. त्यानंतर कोंडी झाल्याने लोकांनी आपल्या आणि नातेवाइकांच्या बँक खात्यात मोठय़ा रकमा जमा केल्यात. अकोल्यातूनही उद्योजक, अधिकारी आणि व्यावसायिकांनी आपल्या बँक खात्यात हजार-पाचशेच्या जुन्या नोटांचा भरणा केला. मोठय़ा रकमा बँक खात्यात जमा झाल्याने संशयित ठरलेल्या या मोठय़ा खात्यांची यादी बँकांच्या मुख्य शाखेतून रिझर्व्ह बँकेला गेली आहे. त्या आधारावरून आता वर्गीकरण करून यादी तयार करण्यात आली आहे. दहा लाखांच्यावर ज्यांनी बँकेत रकमेचा भरणा केला. त्यांच्या फर्मची आणि आवकचे मूळ स्रोत तपासण्याचे काम या अधिकार्‍यांकडे आहे. वेळप्रसंगी छापे टाकून माहिती काढण्याचे अधिकारही या दोन अधिकार्‍यांना देण्यात आले आहेत; मात्र याबाबत कमालीची गोपनीयता बाळगली जात आहे. अकोला आयकर विभागात मनुष्यबळ कमी असल्याने सेवानवृत्त आयटी अधिकार्‍यांची मदतही मिळविली जात असल्याचे समजते. मध्यंतरी अकोल्यातील तीन नामांकित बँकांची चौकशी सक्त वसुली संचालनालये (इन्फोर्समेंड डायरेक्टरेट) केली. ईडीच्या चार अधिकार्‍यांनी ही अकोल्यातील बँकांची झाडाझडती घेतल्यानंतर आता आयटीने चौकशीचे शस्त्र उपसले. यासंदर्भात आयकर विभागाच्या अधिकार्‍यांना विचारणा केली असता त्यांनी बोलण्यास नकार दिला. पॅन कार्ड, आधार कार्ड, मोबाइल क्रमांक अनेक बँकांत वारंवार आढळणारे खातेही वाद्यांत सापडले आहे.