शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

..तर संबंधित अधिकारी व कर्मचार्‍यास जबाबदार धरणार

By admin | Updated: May 30, 2014 01:14 IST

कोर्‍या शिधापत्रिका गहाळ प्रकरणी जबाबदारी निश्‍चित

वाशिम : कोर्‍या शिधापत्रिका गहाळ झाल्यास संबंधित तहसीलदार, अन्नधान्य वितरण अधिकारी, शिधावाटप अधिकारी किंवा संबंधित कोणत्याही कर्मचार्‍यास आता थेट जबाबदार धरले जाणार आहे. राज्य शासनाने यासंदर्भात जारी केलेल्या निर्देशांमध्ये हे स्पष्ट करण्यात आले आहे. पात्र लाभार्थी कुटुंबांना नवीन शिधापत्रिका देताना घ्यावयाच्या दक्षतेबाबत राज्य शासनाने २९ जून २0१३ रोजी शासन निर्णयाद्वारे सविस्तर सूचना दिल्या होत्या. शिधापत्रिका प्राप्त झाल्यानंतर कार्यालयाने त्याचे जतन करण्याची विशिष्ट कार्यपद्धती या निर्णयान्वये विहीत करण्यात आलेली आहे. त्यानुसार प्रत्यक्षात वापरलेल्या व उपलब्ध कोर्‍या शिधापत्रिकांचा ताळमेळ ठेवावा, असे या निर्णयान्वये स्पष्ट करण्यात आले होते; मात्र स्पष्ट निर्देश देऊनही पुणे जिल्हय़ात शिधापत्रिकांची काळ्या बाजारात विक्री होत असल्याची बाब अलीकडेच उघडकीस आली होती. या घटनेची शासनाने गंभीर दखल घेतली आहे. या प्रकाराची पुनरावृत्ती होऊ नये, याकरिता अशा घटनांसाठी संबंधित अधिकारी व कर्मचार्‍यांना थेट जबाबदार ठरविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यासाठी राज्य शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने २७ मे रोजी सुधारित निर्देश जारी केले. त्यानुसार अधिकारी वा संबंधित कर्मचार्‍यास थेट जबाबदार धरण्यात येणार आहे.