शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा स्त्री रुग्णालय परिसरात गर्दी करणे पडणार महागात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:44 IST

वाशिम : जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या इमारतीत जिल्हा कोविड हॉस्पिटल असून येथे रुग्णांचे नातेवाईक व इतरांची गर्दी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर ...

वाशिम : जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या इमारतीत जिल्हा कोविड हॉस्पिटल असून येथे रुग्णांचे नातेवाईक व इतरांची गर्दी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी मंगळवारी जमावबंदीचे आदेश जारी केले. दरम्यान, या आदेशामुळे गैरसोय होण्याचा सूर रुग्णांच्या नातेवाईकांमधून उमटत आहे.

जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत आहे. दैनंदिन सरासरी ३६० जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह येत आहे. त्यामुळे जिल्हावासीयांची चिंताही वाढत आहे. कोरोनाबाधितांवर उपचार करण्यासाठी जिल्ह्यात दोन सरकारी कोविड हॉस्पिटल व आठ कोविड केअर सेंटर आहेत. मध्यम व गंभीर स्वरूपाची लक्षणे असणाऱ्या रुग्णांवर जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या इमारतीत जिल्हा कोविड हॉस्पिटलची सुविधा उपलब्ध केली असून, येथे ऑक्सिजन व व्हेंटिलेटरची सोय आहे. याशिवाय २० पेक्षा अधिक खासगी कोविड हॉस्पिटल आहेत. आर्थिक बाजू जमेची नसलेले रुग्ण सरकारी कोविड हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्याला प्राधान्य देतात. जिल्हा स्त्री रुग्णालय परिसरातील जिल्हा कोविड हॉस्पिटल येथे रुग्णांचे नातेवाईक व इतर व्यक्तींची गर्दी होत असल्याची बाब जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनात आली. वारंवार सांगूनही गर्दी कमी होत नसल्याचे पाहून शेवटी जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी मंगळवारी जिल्हा स्त्री रुग्णालय परिसरात जमावबंदी आदेश लागू करून गर्दी करणाऱ्यांची गय केली जाणार नसल्याचा अप्रत्यक्ष इशाराच दिला.

कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा एक भाग म्हणून फौजदारी दंड प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ अन्वये नालंदा नगर, चिखली रोड येथील स्त्री रुग्णालय (लेडी हार्डिंग) परिसरात कोरोना बाधित रुग्णांव्यतिरिक्त रुग्णांचे नातेवाईक व इतर व्यक्ती यांना रुग्णालय परिसरात गर्दी करून जमाव करण्यास मनाई करण्यात आली आहे. गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी हा आदेश आवश्यक असला तरी यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांची तसेच स्वॅब देण्यासाठी जाणाऱ्यांची गैरसोय होण्याची शक्यता नातेवाईकांमधून व्यक्त केली जात आहे.

००००

बॉक्स...

तर गुन्हेही दाखल होतील

जमावबंदी आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणत्याही व्यक्ती, संस्था अथवा समूह यांनी फौजदारी दंड प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ अन्वये आणि भारतीय दंड संहिता १८६० चे कलम १८८ अन्वये शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येईल. अशा व्यक्ती अथवा समूह यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम १८८ अन्वये गुन्हे दाखल करण्यासाठी संबंधित ठाण्याचे उपनिरीक्षक दजार्पेक्षा कमी नाही, अशा अधिकाऱ्यास प्राधिकृत करण्यात आले आहे. त्यामुळे या आदेशाचे उल्लंघन केल्यास वेळप्रसंगी गुन्हाही दाखल होऊ शकतो.

०००००००००