शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

शिलाई मशीन व दर कराराचा मुद्दा गाजला

By admin | Updated: February 6, 2016 02:31 IST

वाशिम जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेचे कामकाज अपूर्ण राहील्याने १२ फेब्रुवारीला पुन्हा सर्वसाधारण सभा.

वाशिम : रखडलेली शिलाई मशीन योजना, इ-टेंडरिंगऐवजी दर कराराने खरेदी, रोहयोची अपूर्ण कामे, पाणीटंचाई, जिल्हा नियोजन व विकास समितीच्या कामांचे ह्य२५-१५ प्रमाणह्ण आदी विषयांवर जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत वादळी चर्चा झाली. दरम्यान, सायंकाळी उशिरापर्यंत कामकाज संपत नसल्याचे पाहून पुन्हा १२ फेब्रुवारी रोजी सर्वसाधारण सभा बोलाविली आहे. स्थानिक जिल्हा परिषदेच्या वसंतराव नाईक सभागृहात शुक्रवारी पार पडलेल्या सभेला अध्यक्ष सोनाली जोगदंड, मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी के.एम. अहमद, उपाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, सभापती चक्रधर गोटे, सुभाष शिंदे, ज्योती गणेशपूरे, पानुताई जाधव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी योगेश जवादे आदींची उपस्थिती होती. सुरुवातीला इतवृत्ताचे वाचन करण्यात आले. त्यानंतर महिला सदस्यांनी शिलाई मशीन वाटपाचा मुद्दा छेडला. २0१५-१६ सत्र संपायला अवघा दीड महिना शिल्लक असतानाही शिलाई मशीनचे वाटप नसल्याने सदस्य आक्रमक झाले. दर करार आणि ई-टेंडरिंगच्या पेचात शिलाई मशीन अडकल्याचे पाहून महिला व बालकल्याण सभापती ज्योती गणेशपुरे यांनी हा प्रश्न आठवड्यात निकाली काढण्याच्या सूचना केल्या. सभापती सुभाष शिंदे यांनीदेखील शिलाई मशीन तातडीने वाटप झालेच पाहिजे, अशी भूमिका घेतली. जलसंधारण, पाणीटंचाई, चाराटंचाई, दूष्काळ निवारणार्थ उपाययोजना, समाजकल्याण विभागांतर्गतची कामे आदी विषयांवर जिल्हा परिषद सदस्य विश्‍वनाथ सानप, श्याम बढे, नथ्थू कापसे, स्वप्निल सरनाईक, गजानन अमदाबादकर, विकास गवळी, सचिन रोकडे, गौरी पवार, सुधीर गोळे आदींनी प्रश्न मांडले. जलसंधारणाच्या कामांना प्राधान्य आणि दुष्काळ निवारणार्थ उपाययोजना या दोन मुद्दय़ांना प्राधान्य देण्याच्या सूचना पदाधिकार्‍यांनी केल्या. यावेळी सहा पंचायत समित्यांच्या सभापतींनी जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून मिळणारी सहा वाहने नाकारून सदर निधी २0१५-१६ मधील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना समप्रमाणात देण्याचा ठरावा घेतला. या कामी वीरेंद्र देशमुख, भास्कर पाटील, छाया पाटील, वर्षा नेमाने, धनश्री राठोड व कुसुम लबडे यांनी पुढाकार घेतला, हे विशेष.