शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सिंचन प्रकल्प अद्याप तहानलेलेच!

By admin | Updated: July 12, 2017 20:23 IST

वाशिम : पावसाळ्याचे दिवस असतानाही पावसाने दीर्घ दडी मारल्यामुळे खरीपातील पिके संकटात सापडली आहेत. यासोबतच सिंचन प्रकल्पांचीही पाणीपातळी वाढण्याऐवजी घटत चालल्याचे विदारक चित्र निर्माण झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : पावसाळ्याचे दिवस असतानाही पावसाने दीर्घ दडी मारल्यामुळे खरीपातील पिके संकटात सापडली आहेत. यासोबतच सिंचन प्रकल्पांचीही पाणीपातळी वाढण्याऐवजी घटत चालल्याचे विदारक चित्र निर्माण झाले आहे. जिल्ह्यातील बोराळा येथील अडोळ सिंचन प्रकल्पात आजमितीस मृत जलसाठा शिल्लक असून आसेगाव पो.स्टे . धरणात उणापूरा १० टक्के जलसाठा असल्याची माहिती आहे.बोराळा धरणात मृत जलसाठाबोराळा येथील अडोळ लघू प्रकल्पामध्ये सद्या मृत जलसाठा शिल्लक राहिलेला आहे. मागील तीन वर्षापासून हे धरण १०० टक्के कधीच भरलेले नाही. मागील वर्षी पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने अडोळ लघूप्रकल्प ५५ टक्के भरले होते, याच धरणाच्या क्षेत्रामध्ये हजारो हेक्टर जमीन सिंचनाखाली येते. रिसोड, शिरपूर, रिठद या मोठ्या गावांनाही त्यातूनच पाणीपुरवठा केला जातो. मागील तीन वर्षापासून धरण न भरल्यामुळे परिसरातील शेतकरी सिंचन करू शकत नसल्याने पिकांच्या सरासरी उत्पन्नात मोठी घट येत आहे. पाणी उपलब्ध झाल्यास भुईमुंग, हळद, हरभरा आदी पिके घेणे शक्य होतील; परंतू यंदाही गतवर्षीपेक्षाही गंभीर परिस्थिती असून पावसाने दीर्घ दडी मारल्यामुळे धरणात आजमितीस मृत जलसाठा शिल्लक राहिला आहे. दरम्यान, येत्या काही दिवसांत मोठा पाऊस न झाल्यास जनावरांसोबतच नागरिकांनाही भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागेन, अशी शक्यता वर्तविली जात आहे.

आसेगाव बांध धरणात १० टक्के जलसाठा आसेगाव पो. स्टे. येथील बांध धरण गतवर्षी १०० टक्के भरले होते. यंदा मात्र पावसाळा सुरू होऊनही मोठा पाऊस अद्याप न झाल्यामुळे धरणात केवळ १० टक्क्याच्या आसपास जलसाठा शिल्लक राहिला आहे. परिसरातील लहान स्वरूपातील धरण तसेच पाझर तलावांमध्येही पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवत आहे. यावर्षी विहिरींचीही पाणीपातळी तसूभर देखील वाढलेली नाही. यामुळे परिसरातील अनेक गावांमध्ये आतापासूनच पाणीटंचाईचे चटके सोसावे लागत आहेत.