--------------
स्वस्त धान्य वितरण प्रलंबित
वाशिम : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाने केशरी, अंत्योदय शिधापत्रिकाधारकांना मोफत रेशन धान्य वितरण सुरू केले आहे. त्यात काही दुकानात या महिन्यातील स्वस्त धान्याचे वितरण अद्याप करण्यात आले आहे.
-----------------
नियमांच्या उल्लंघनप्रकरणी कारवाई
वाशिम : वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर असून, कारंजामार्गे परजिल्ह्यातून येणाऱ्या दुचाकी वाहनांची पोलिसांकडून तपासणी केली जात आहे. याअंतर्गत सोमठाणा फाट्यावर शुक्रवारी ७ वाहनांवर कारवाई करण्यात आली.
------
पीककर्जासाठी शेतकऱ्यांच्या वाऱ्या
वाशिम : कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांना राष्ट्रीयीकृत बँका कर्ज देण्यास टाळाटाळ करत असल्याने शेतकरी मेटाकुटीस आले आहेत. पीककर्जासाठी वारंवार बँकांच्या वाऱ्या करीत असल्याचे चित्र मानोरा येथे सोमवारी पाहायला मिळाले.
--------------------
इंझोरीत स्वच्छतेबाबत जनजागृती
वाशिम : कोरोना विषाणूचा संसर्ग थांबविण्यासाठी इंझोरी ग्रामपंचायतीकडून विविध उपाययोजना राबविण्यात येत असून, याअंतर्गत सोमवारी गावात स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यात आली.
---------
मूग पिकावर रोगाचा प्रादुर्भाव!
वाशिम : यंदा जिल्ह्यात आधीच मूग पिकाचे क्षेत्र घटले असताना या पिकावर सद्यस्थितीत विविध रोगांचा प्रादुर्भाव झाला असून, झाडांची वाढ खुंटल्याने मूग उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत.
------------- शेतीशाळेला महिलांचा प्रतिसाद
वाशिम : कारंजा तालुक्यातील पोहा येथे पाणी फाऊंडेशनच्या शेतीशाळेला महिलांचा प्रतिसाद लाभत आहे. रविवारी पार पडलेल्या ऑनलाईन शेतीशाळेला सोयाबीन उत्पादक शेतकरी व उमेद स्वयंसहाय्यता समुहाच्या महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली होती. या शेतीशाळेला उमेदच्या मनीषा राठोड व त्यांच्या समुहाच्या महिला आवर्जून उपस्थित होत्या.