शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
2
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
3
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
4
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
5
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
6
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
7
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
8
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
9
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
10
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
11
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
12
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
13
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
14
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
15
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
16
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
17
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
18
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
19
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
20
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
Daily Top 2Weekly Top 5

‘रेमडेसिविर’ इंजेक्शनप्रकरणी मेडिकलची झाडाझडती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 10:29 IST

Washim News : आतापर्यंत सात मेडिकलची तपासणी केली असून, तीन जणांकडून खुलासा मागविण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार होत असल्याच्या तक्रारीवरून जिल्हा प्रशासनाच्या निर्देशानुसार अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने गुरुवार, ६ मे पासून मेडिकलची झाडाझडती सुरू केली. आतापर्यंत सात मेडिकलची तपासणी केली असून, तीन जणांकडून खुलासा मागविण्यात आला.जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असताना, त्या तुलनेत आरोग्य सुविधा अपुऱ्या पडत आहेत. मागणीच्या तुलनेत रेमडेसिविर व अन्य औषधांचा पुरवठा होत नाही. त्यामुळे रुग्णांसह नातेवाईकांची धावाधाव सुरू आहे. दरम्यान, काही ठिकाणी रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार होत असून, चढ्या दराने विक्री होत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. इंजेक्शनसंदर्भात कुणाचीही गैरसोय होऊ नये, इंजेक्शनचा काळाबाजार होऊ नये, चढ्या दराने विक्री होऊ नये म्हणून जिल्हा प्रशासनाने मेडिकलची तपासणी करण्याच्या सूचना अन्न व औषध प्रशासन विभागाला दिल्या आहेत. त्यानुसार संबंधित कोविड रुग्णालयाशी संलग्न असलेल्या मेडिकलची झाडाझडती सुरू असून, आतापर्यंत सात मेडिकलची तपासणी करण्यात आली. यापुढेही तपासणी केली जाणार असून, गैरप्रकार आढळून आल्यास कुणाचीही गय केली जाणार नसल्याचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे. 

तीन जणांकडून खुलासा मागविलारेमडेसिविर इंजेक्शन देण्यासंदर्भात काही मार्गदर्शक सूचना आहेत.‘एचआरसीटी’ स्कोर कमी असताना शक्यतोवर रेमडेसिविर इंजेक्शन देणे टाळावे, अशा सूचना दिलेल्या आहेत. अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने तपासणी केली असता, तीन जणांनी ‘एचआरसीटी’ स्कोर कमी असताना रेमडेसिविर इंजेक्शन दिल्याचे समोर आले. यासंदर्भात खुलासा मागविण्यात आला असता, संबंधित रुग्णांना इतरही आजार असल्याने आणि ‘एचआरसीटी’ स्कोर वाढू नये म्हणून रेमडेसिविर इंजेक्शनची आवश्यकता असल्याने त्याचा वापर करण्यात आल्याचे सांगण्यात आले. 

रेमडेसिविर इंजेक्शनप्रकरणी तपासणी करण्याच्या सूचना अन्न व औषध प्रशासन विभागाला दिल्या आहेत. त्यानुसार तपासणी करण्यात येत आहे. सात मेडिकलची तपासणी केली असून, तीन जणांकडून खुलासा मागितला आहे. - शैलेश हिंगेनिवासी उपजिल्हाधिकारी, वाशिम

टॅग्स :washimवाशिमremdesivirरेमडेसिवीर