मालेगाव (वाशिम): मेडशी तपासणी नाक्यावर एसटी बसच्या तपासणीदरम्यान ५ संशयित बांगलादेशी युवकांना धारदार शस्त्रासह रविवारी ताब्यात घेण्यात आले होते. या घटनेतील पाचही जणांची कसून चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. मेडशी तपासणी नाक्यावर पोलिसांनी मलकापूरहून नांदेडला जाणारी एम. एच. ४0 वाय ५७२२ क्रमांकाच्या एसटी बसची त पासणी केली असता पोलिसांना शस्त्रसाठा असलेली बेवारस बॅग आढळली होती. याप्रकरणी पोलिसांनी संशयावरून पाच जणांना ताब्यात घेत चौकशीचे चक्र जलदगतीने फिरविले. याप्रकरणी बांगलादेशातील जशोर जिल्ह्यातील धम्मपोल तालुक्यातील रघुनाथपूर येथील मो. शोगुर मो. यारीफ, मो. सैफुल मो. अनार, मो. अहेदल नूर मोहम्मद, मो. सघान मो. सुलतान, मो. मिंदू फजल आणि मो. फैजली रहमान यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. ६ रोजी या पाचही संशयितांना मालेगावच्या न्यायालयात हजर केले होते. यामधील दोन जण अल्पवयीन असल्याने त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी वाशिमला पाठविले. वैद्यकीय तपासणी पूर्ण झाल्यानंतर अल्पवयीय संशयितांना मालेगावला आणून न्यायालयीन कोठडी की पोलिस कोठडी याबाबत निर्णय होणार आहे. रात्री उशिरापर्यंत याप्रकरणी चौकशीची प्रक्रिया सुरू होती.
बांगलादेशी संशयीतांची चौकशी
By admin | Updated: October 7, 2014 01:22 IST