शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
2
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
3
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
4
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
5
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
6
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
7
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
8
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
9
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळालयला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
10
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
11
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
12
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
13
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
14
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
15
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
16
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
17
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
18
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
19
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापारविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
20
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!

कपाशी, सोयाबीनवर रोगांचे आक्रमण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2017 01:23 IST

सुलतानी संकटाने उद्ध्वस्त होत असलेल्या  शेतकरी आता कपाशी व सोयाबीनवर आलेल्या  रोगामुळे पार मोडून गेला आहे. या परिसरात झालेल्या  अल्प पावसामुळे कपाशीवर रसशोधक किडी  आदी  रोगांनी  आक्रमण केले आहे. सोयाबीनवर मोठय़ा  प्रमाणात अळ्यांचा प्रादुर्भाव झाल्यामुळे  सोयाबीन व  कपाशीच्या उत्पादनावर परिणाम व कपाशीच्या उत् पादनावर परिणाम होण्याची  भीती शेतकर्‍यांमध्ये  व्यक्त केली जात आहे.

ठळक मुद्देशेतकर्‍यांमध्ये उत्पादन घटण्याची भीती कृषी विभागाच्या मार्गदर्शनापासून शेतकरी वंचित

लोकमत न्यूज नेटवर्क मानोरा : सुलतानी संकटाने उद्ध्वस्त होत असलेल्या  शेतकरी आता कपाशी व सोयाबीनवर आलेल्या  रोगामुळे पार मोडून गेला आहे. या परिसरात झालेल्या  अल्प पावसामुळे कपाशीवर रसशोधक किडी  आदी  रोगांनी  आक्रमण केले आहे. सोयाबीनवर मोठय़ा  प्रमाणात अळ्यांचा प्रादुर्भाव झाल्यामुळे  सोयाबीन व  कपाशीच्या उत्पादनावर परिणाम व कपाशीच्या उत् पादनावर परिणाम होण्याची  भीती शेतकर्‍यांमध्ये  व्यक्त केली जात आहे.दरम्यान, रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर संबंधित शे तकर्‍यांना कृषी विभागाकडून मार्गदर्शन होणे गरजेचे  असताना मात्र ते होत नसल्याच्या तक्रारी शे तकर्‍यांकडून होत आहे. या परिस्थितीत नेमके काय  करावे, या संभ्रमात शेतकरी आहे. यावर्षी  हवामान  खात्याने जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त केला होता;   मात्र हा अंदाज खोटा ठरवत पावसाने चांगलीच दडी  मारली.  अधूनमधून आलेल्या रिमझिम पावसाने  िपकांना जीवनदान मिळाले. पिकाची वाढही बरी  झाली; मात्र हवा तसा पाऊस न आल्याने जमिनीला  भेगा पडल्या होत्या तसेच जमिनीतील तापमानातही  मोठी वाढ झाली. परिणामी, सध्या फळधारणेच्या अवस्थेत असलेल्या  सोयाबीन व कपाशी या दोन्हीही पिकांवर विविध  रोगांनी आक्रमण केले आहे. कपाशीवर रसशोधक  किडी यांच्यासह आदी रोगांनी  आक्रमण केले आहे.  त्यामुळे त्याची पाने सुकू लागली आहे. तर  सोयाबीनच्या शेंगा अळ्या मोठय़ा प्रमाणावर फस्त  करत आहे. त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा संकटात  सापडला आहे. विशेष म्हणजे, सोयाबीनवर  फळधारणेच्या काळात  शक्यतो अळ्यांच्या प्रादुर्भाव  होत नाही; मात्र यंदा पहिल्यांदाच अशा स्थितीत  अळ्याचे अतिक्रमण झाले आहे. यासंदर्भात कृषी  विभागाशी शेतकर्‍यांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न  केला; मात्र त्यांना ‘रिस्पॉन्स’ मिळाला नाही.

कृषी केंद्रांकडून शेतकर्‍यांची लूटएकीकडे पिकांवर रोगाच्या आक्रमणाने शेतकरी ह तबल झाला असताना त्यांच्या आशिक्षितपणाचा  फायदा घेत कृषी विकेत्यांकडून शेतकर्‍यांची लूट  केली जात आहे. अनेक शेतकर्‍यांना पिकांवरील  कीड रोग व त्यावरील उपाय. या गोष्टीची माहिती  नसते, त्यामुळे ते संभ्रमात असतात. कृषी  विभागाकडूनही पाहिजे तसे मार्गदर्शन मिळत नाही.  अशा परिस्थितीत कृषी विक्रेेते कोणतीही औषधे शे तकर्‍यांच्या माथी मारत आहेत.

कृषी अधिकार्‍यांचा ‘नो रिस्पॉन्स’हाताशी आलेल्या पिकावर रसशोधक किडी,  मिलीबग आदी रोगामुळे कपाशीच्या झाडाचा श्‍वास  कोंडला जात आहे. याबाबत तालुका कृषी अधिकारी  समाधान पडधान यांना फोन केला असता, त्यांनी रिस् पॉन्स न देता फोन कट केला, ही त्यांची नित्याचीच  बाब आहे.