शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

अवैध उत्खनन, वाहतुकीस बसणार चाप!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2017 00:58 IST

मानोरा : राज्यातील रेतीचे अवैध उत्खनन व वाहतुकीस चाप बसावा आणि रेतीचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्यात असावे, यासाठी २0१३ च्या रेती निर्धारित धोरणात सुधारणा करून रेतीचे नवे विधेयक लवकरच विधिमंडळात मांडले जाणार आहे, अशी माहिती महसूल राज्यमंत्री तथा वाशिमचे पालकमंत्री संजय राठोड यांनी मंगळवारी दिली.

ठळक मुद्देपालकमंत्र्यांची माहिती सुधारित धोरण

लोकमत न्यूज नेटवर्कमानोरा : राज्यातील रेतीचे अवैध उत्खनन व वाहतुकीस चाप बसावा आणि रेतीचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्यात असावे, यासाठी २0१३ च्या रेती निर्धारित धोरणात सुधारणा करून रेतीचे नवे विधेयक लवकरच विधिमंडळात मांडले जाणार आहे, अशी माहिती महसूल राज्यमंत्री तथा वाशिमचे पालकमंत्री संजय राठोड यांनी मंगळवारी दिली. या धोरणानुसार, रेती घाटांच्या लिलाव प्रक्रियेत ग्रामपंचायतला महत्त्व प्राप्त होणार आहे. लिलावातून गावाच्या विकासासाठी ग्रामपंचायतला गौण खनिज निधीही मिळणार आहे. या सुधारित विधेयकात गाव आणि ग्राहकांच्या हिताचे बदल प्रस्तावित केल्याचे ना. राठोड यांनी सांगितले. आता रेती घाटाच्या लिलावातून मिळालेल्या उत्पन्नातून संबंधित ग्रामपंचायतींना गौण खनिज निधी देण्याचे प्रस्तावित आहे. गावातील रेतीघाटाचा लिलाव होण्यासाठी दरवर्षी १५ जुलै ते ५ ऑगस्टपयर्ंत ग्रामसभा घेणे बंधनकारक राहणार आहे. ग्रामसभेने रेतीघाटाच्या लिलावास नकार दिल्यास त्याची सबळ कारणे सादर करावी लागणार आहेत. रेती घाटांचे संरक्षण करण्याची जबाबदारीही ग्रामपंचातींवर राहणार आहे. या घाटांमधून अवैध उत्खनन आढळल्यास संबंधित ग्रामसेवक व सरपंच यांना जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई प्रस्तावित केली जाणार आहे. सरपंचाचे सदस्यत्वसुद्धा रद्द करण्याची तरतूद नवीन विधेयकात राहणार आहे. ग्रामसभेने रेतीघाटाच्या लिलावास होकार दिल्यास या लिलावाच्या मिळणार्‍या उत्पन्नातून  १0 ते २५ टक्के गौणखनिज निधी ग्रामपंचायतीला गावाच्या विकासाकरिता मिळणार आहे. याशिवाय विविध मुद्दे प्रस्तावित करण्यात आले आहेत.  नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात हे विधेयक विधिमंडळात ठेवण्यात येईल, असे ना. संजय राठोड यांनी सांगितले.