वाशिम : काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी जाहीर करण्यात आली असली तरी राष्ट्रवादी काँग्रेस सर्वच मतदारसंघासाठी मुलाखती घेणार असून इच्छूक उमेदवारांच्या मुलाखती २७ ऑगस्ट रोजी मुंबई येथे होणार आहेत.वाशिम जिल्हयातील तीनही मतदार संघाकरीता राष्ट्रवादीने उमेदवारांचे अर्ज मागीतले असून त्या दृष्टीने उमेदवारांची चाचपणी सुरू आहे. २७ ऑगस्ट रोजी मुबई येथे होणार्या मुलाखती दरम्यान कारंजा या एका मतदार संघासोबतच आणखी दोन असलेल्या वाशिम व रिसोड मतदारसंघावर राष्ट्रवादी दावा करणार आहे. कारंजा राष्ट्रवादीसाठीच असला तरी वाशिम व रिसोड या दोन मतदार संघावर राष्ट्रवादी काँग्रेसने दावा केल्याने इच्छुकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. आतापर्यत तीनही विधानसभा मतदार संघासाठी इच्छुकांनी १३ अर्ज नेले असून यापैकी सहा अर्ज जिल्हाध्यक्षांकडून नेण्यात आले आहेत. अर्ज नेणार्या सर्व इच्छूक उमेदवारांची मुलाखत मुंबई येथील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालय येथे २७ ऑगस्ट रोजी होत असून या मुलाखतीत ज्या जिल्हयाच्या मुलाखती असतील त्या जिल्हयाचे जिल्हाध्यक्ष, पालकमंत्री यांची उपस्थिती राहणार आहे. तसेच मुलाखती उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पार्लमेंट सदस्यांची उपस्थिती राहणार आहे.
राष्ट्रवादी घेणार सर्व मतदार संघासाठी मुलाखती
By admin | Updated: August 21, 2014 23:04 IST