शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागात इंटरनेट सेवा ठप्प; ऑनलाईन एज्युकेशनचा बोजवारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:44 IST

‘कोविड-१९’च्या प्रकोपामुळे सर्वसामान्य पालकांचे आर्थिक नियोजन कोसळले आहे. एकीकडे त्याला आपल्या पाल्याचे शैक्षणिक नुकसान होऊ नये असे वाटते, तर ...

‘कोविड-१९’च्या प्रकोपामुळे सर्वसामान्य पालकांचे आर्थिक नियोजन कोसळले आहे. एकीकडे त्याला आपल्या पाल्याचे शैक्षणिक नुकसान होऊ नये असे वाटते, तर दुसरीकडे आर्थिक बाबतीत तो हतबल आहे. ऑनलाईन शिक्षणासाठी संगणक किंवा स्मार्टफोन, टॅब्लेट अत्यावश्यच आहे. गोरगरीब पालकांची आर्थिक स्थिती नाही. कसाबसा मोबाईल घेतला तरी दर महिन्याला इंटरनेटचा खर्च करावा लागत आहे. शिवाय अभ्यासक्रमाची सर्व पुस्तके आणि वह्यासुद्धा घ्याव्या लागत असल्याने ऑफलाईन शिक्षणापेक्षा ऑनलाईन शिक्षणाने पालकांचे कंबरडे मोडल्याचे दिसत आहे. त्यातच ग्रामीण भागांत इंटरनेट सेवा विस्कळीत होत असल्याने ऑनलाईन शिक्षणाचा कोणताही फायदा होत नसून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर मोठा परिणाम होत आहे.

------

१) जिल्ह्यातील वर्गनिहाय विद्यार्थी

१) पहिली - १९,६९०

२) दुसरी - २०,९९८

३) तिसरी - १९,६९८

४) चौथी - २१,१७७

५) पाचवी - २१,०५२

६) सहावी - २१,१३६

७) सातवी -२१,४३६

८) आठवी - २१,५००

९) नववी - २०,७००

१०) दहावी - १९,७१५

२) वेगवेगळी सीम घेऊनही फायदा नाही

कोरोना संसर्गामुळे शाळा बंद असून, विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण दिले जात आहे. यासाठी मोबाईल किंवा टॅब्लेटवर इंटरनेट चालू ठेवावे लागते. महिन्याकाठी पालकांना इंटरनेटवर किमान ३०० रुपये खर्च करावे लागत आहेत. त्यातही ग्रामीण भागात इंटरनेट सुविधा विस्कळीत असल्याने एकाऐवजी दोन, तीन कंपन्यांची सीम कार्ड घेऊनही फायदा होत नसल्याचे दिसते.

------------------

१) कोट : कोरोनामुळे ऑनलाईन शिक्षण दिले जात आहे. त्यामुळे पाल्यासाठी ८,५०० रुपयांचे दोन स्वतंत्र स्मार्टफोन घ्यावे लागले. दर महिन्याला एका कंपनीच्या सीम रिचार्जसाठी २४९ रुपये खर्च करावा लागतो. त्यात इंटरनेट सेवा विस्कळीत असल्याने दोन सीम घेतली. परंतु फायदा होत नाही.

-गजानन ढोक, पालक,

---------------------

२) कोट : यंदाही कोरोनामुळे शाळा बंदच असून, विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण दिले जात आहे. मला दोन मुले आहेत. त्यांच्या ऑनलाईन क्लासची वेळ वेगवेगळी असली तरी ऑनलाईन अभ्यासक्रमासाठी मोबाईलमधील स्टोरेज स्पेस पुरत नाही. त्यात इंटरनेटही नसते. त्यामुळे पाल्याचे शैक्षणिक नुकसान होत आहे.

-नितीन उपाध्ये,

पालक.