जिल्हा परिषद गटाचे गाव असलेल्या केनवड येथे परिसरातील २० गावांतील नागरिकांचे येणे, जाणे असते. परिसरातील ग्रामीण रस्ते खड्डेमय झाल्याने याचा त्रास वाहनचालकांना सहन करावा लागत आहे. शिरपूर येथे उपबाजार समिती, पोलीस स्टेशन, आरोग्यवर्धिनी केंद्र, बाजारपेठ आहे. त्यामुळे परिसरातील २० ते २५ गावांतील नागरिकांचे शिरपूर येथे येणे, जाणे असते. परिसरातील ग्रामीण रस्ते खड्डेमय झाल्याने समोरून येणाऱ्या वाहनाला बाजू देताना दमछाक होते. वाशिम तालुक्यातील सुरकंडी परिसरातील रस्तेही खड्डेमय झाले आहेत. कवठा जिल्हा परिषद गटातील व्याडकडे जाणाऱ्या रस्त्यावर खड्डे पडले. ग्रामीण रस्त्याच्या दुरूस्तीसाठी शासनाने पुरेशा प्रमाणात निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी यापूर्वीही अनेकांनी केली. परंतु , पुरेशा प्रमाणात निधी उपलब्ध होत नसल्याने वाहनचालकांची गैरसोय होत आहे.
ग्रामीण रस्ते कामांसाठी निधी अपुरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:43 IST