जिल्हा नियोजन भवन येथे पार पडलेल्या या सभेला जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, खा. भावना गवळी, आ. अमित झणक यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. यावेळी पालकमंत्री देसाई म्हणाले, शहरी तसेच ग्रामीण भागातील सार्वजनिक वितरण व्यवस्था सुरळीत राहण्यासाठी प्रयत्न करावेत. जिल्ह्यात विशेष मोहीम सर्व रास्त भाव दुकानांचे सर्वेक्षण करून त्यांच्याकडे जोडण्यात आलेल्या शिधापत्रिकांविषयी माहिती संकलित करावी. या माहितीच्या आधारे जिल्ह्यात ज्या ठिकाणी नवीन दुकानांची आवश्यकता आहे, अशा ठिकाणांची आणि दुकानांच्या मंजुरीबाबतचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांमार्फत शासनाला सादर करावा, असे त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील विंचनकर म्हणाले, जिल्ह्यात गेल्या एक वर्षात १५ शिवभोजन केंद्रांच्या माध्यमातून ४ लाख ५१ हजार ५८९ थाळ्या वितरित केल्या तसेच लॉकडाऊन काळात जिल्ह्यातील २६ रास्त भाव दुकानांवर कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये १२ दुकानांचे परवाने रद्द तर ४ दुकानांचे परवाने निलंबित केले तसेच १० दुकानांची अनामत जप्त करून ताकीद देण्यात आल्याचे विंचनकर यांनी सांगितले.
अन्नधान्य वितरणाबाबत तक्रारींचा निपटारा करण्याचे निर्देश !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:29 IST