शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

घरकुल लाभार्थीची ३० हजाराची रक्कम अचूक बँक खात्यात जमा करण्याचे निर्देश  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2018 13:44 IST

लाभार्थीच्या बँक खात्यात चुकीने जमा केलेले ३० हजार रुपये परत घ्यावे तसेच पात्र लाभार्थीच्या बँक खाते क्रमांकाची दुरूस्ती करून घरकुलाचे अनुदान जमा करण्याचे निर्देश पंचायत समिती तसेच जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेला दिले. 

ठळक मुद्दे दुर्गा धुळधुळे यांचे ३० हजार रुपयांचे अनुदान रिठद येथीलच अन्य एका प्रतिक्षा यादीतील लाभार्थीच्या बँक खात्यात जमा झाले. बँक खात्यात जमा केल्याची बाब ‘लोकमत’ने २५ जुलै रोजी उघडकीस आणताच, जिल्हास्तरावरून तातडीने सूत्रे हलली.कारवाई प्रस्तावित करण्याच्या सूचनाही दिल्या जातील, अशी माहिती देशमुख यांनी रविवारी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
<p>लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : रिसोड पंचायत समितीअंतर्गत येणाºया रिठद येथील एका लाभार्थीचे ३० हजार रुपयांचे अनुदान दुसºयाच लाभार्थीच्या बँक खात्यात जमा केल्याची बाब ‘लोकमत’ने २५ जुलै रोजी उघडकीस आणताच, जिल्हास्तरावरून तातडीने सूत्रे हलली. या वृत्ताची दखल घेत जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख यांनी प्रतिक्षा यादीतील त्या लाभार्थीच्या बँक खात्यात चुकीने जमा केलेले ३० हजार रुपये परत घ्यावे तसेच पात्र लाभार्थीच्या बँक खाते क्रमांकाची दुरूस्ती करून घरकुलाचे अनुदान जमा करण्याचे निर्देश पंचायत समिती तसेच जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेला दिले. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत सन २०१७-१८ या वर्षात रिठद ता. रिसोड येथील दुर्गा सोपान धुळधुळे, कमल ज्ञानबा धुळधुळे या दोन लाभार्थींना घरकुल मंजूर झाले. या लाभार्थींकडून अचूक बँक खाते क्रमांक संकलित केल्यानंतर अनुदानाचा पहिला हप्ता म्हणून ३० हजार रुपये बँक खात्यात जमा करण्यात आले. दुर्गा सोपान धुळधुळे व कमल ज्ञानबा धुळधुळे यांनी अचूक बँक खाते क्रमांक दिल्यानंतर पंचायत समिती स्तरावरील संबंधित कर्मचाºयाने चुकीचे बँक खाते क्रमांक ‘फिडींग’ केल्याने अनुदान वितरणाचा घोळ निर्माण झाला. कमल ज्ञानबा धुळधुळे यांचे ३० हजार रुपयांचे अनुदान दुर्गा सोपान धुळधुळे यांच्या बँक खात्यात जमा झाले तर दुर्गा धुळधुळे यांचे ३० हजार रुपयांचे अनुदान रिठद येथीलच अन्य एका प्रतिक्षा यादीतील लाभार्थीच्या बँक खात्यात जमा झाले. एका वर्षानंतरही बँक खाते क्रमांकात दुरूस्ती झाली नसल्याने धुळधुळे यांचे घरकुल बांधकामाचे स्वप्न धुळीस मिळाले. प्रतिक्षा यादीतील अन्य लाभार्थीच्या बँक खात्यात जमा झालेली ३० हजार रुपयांची रक्कम अद्याप पंचायत समिती प्रशासनाने परत घेतली नाही. यासंदर्भात ‘लोकमत’ने २५ जुलै रोजी वृत्त प्रकाशित करताच, जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख यांनी याप्रकरणी योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश रिसोड पंचायत समिती प्रशासनाला दिले. प्रतिक्षा यादीतील लाभार्थीच्या बँक खात्यात चूकीने जमा झालेली ३० हजार रुपयाची रक्कम तातडीने परत घ्यावी तसेच धुळधुळे या लाभार्थीला न्याय द्यावा, अशा सूचना पंचायत समिती व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेला देण्यात आल्या. याप्रकरणी टाळाटाळ करणाºयांविरूद्ध प्रशासकीय कारवाई प्रस्तावित करण्याच्या सूचनाही दिल्या जातील, अशी माहिती देशमुख यांनी रविवारी ‘लोकमत’शी बोलताना दिली.