शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

झटपट सोयाबीन; पाऊस कधीही झाला तरी शेतकरी मालामाल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:47 IST

वाशिम : सोयाबीनची नवनवी वाणं उपलब्ध होत असून, कमी दिवसात उत्पन्न हाती येईल, अशा वाणांकडे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा कल वाढत ...

वाशिम : सोयाबीनची नवनवी वाणं उपलब्ध होत असून, कमी दिवसात उत्पन्न हाती येईल, अशा वाणांकडे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा कल वाढत असल्याचे दिसून येते. जिल्ह्यात यंदा लवकर येणाऱ्या सोयाबीनचे क्षेत्र बऱ्यापैकी असून, सध्या या सोयाबीन काढणीचा हंगाम सुरू आहे. ७ हजार रुपये प्रतिक्विंटलच्या आसपास दर असल्याने याचा फायदा शेतकऱ्यांना होत आहे.

जिल्ह्यात सोयाबीनची सर्वाधिक पेरणी होते. पेरणीखालील क्षेत्रात वाढ होत असल्याचे दिसून येते. गत चार, पाच वर्षांपासून सोयाबीन पिकाला ऐन सोंगणीच्या हंगामात पावसाचा फटका बसत आहे. शिवाय सोयाबीनचे तेच ते वाण घेतल्याने उत्पादनावरही परिणाम होतो. त्यामुळे यंदा अनेक शेतकऱ्यांनी लवकर येणाऱ्या वाणाची पेरणी करण्याचा प्रयोग केला. कमी दिवसात येणारी सोयाबीन सोंगणी सध्या सुरू असून, बाजारात भावही ७ ते ७६०० हजार रुपये प्रतिक्विंटल असल्याने शेतकऱ्यांना तूर्तास तरी दिलासा मिळत आहे.

०००००००

झटपट येणारे सोयाबीन

लवकर येणाऱ्या सोयाबीन काढणीनंतर बाजारात सोयाबीनची आवक कमी असते, त्यामुळे भाव चांगला मिळतो. शेत लवकर रिकामे झाल्याने रबी हंगामाचे चांगले नियोजन होऊ शकते.

.....

मध्यम कालावधीत येणारे सोयाबीन

मध्यम कालावधीत येणारे सोयाबीनदेखील बऱ्यापैकी उत्पन्न देते. सोयाबीन काढल्यानंतरही जमिनीत ओलावा चांगला राहतो. इतर पिके घेण्यासाठी फायदा होतो.

......

जास्त कालावधीत येणारे सोयाबीन

जास्त कालावधीत येणारे सोयाबीन घेतले तर परतीच्या पावसामुळे नुकसान होण्याची शक्यता अधिक असते. शिवाय रबी हंगामात पेरणीसाठी जमीन सज्ज ठेवण्यासही विलंब होतो.

००००००

जिल्ह्यात वाढला सोयाबीनचा पेरा

२०१७ २७६०००

२०१८ २८००००

२०१९ २९२०००

२०२० २९४०००

२०२१ ३०२०००

००००००००००००००००

शेतकरी म्हणतात...

कमी कालावधीत येणारे सोयाबीन घेतल्यामुळे अनेक फायदे आहेत. परतीच्या पावसापासून नुकसान टाळले जाऊ शकते, तसेच बाजारभावही चांगला मिळतो. त्यामुळे या सोयाबीन पेरणीला पसंती दिली.

- गौतम भगत, शेतकरी, चिखली

.......

मध्यम कालावधीत येणारे सोयाबीन घेतले आहे. सध्या बाजारभावही बऱ्यापैकी आहेत. त्यामुळे या सोयाबीनला सहा हजारांपेक्षा अधिक भाव मिळू शकतो. उशिराने येणाऱ्या सोयाबीनला बाजारभाव कमी मिळण्याची शक्यता आहे.

- गणेश परिहार, शेतकरी, नागठाणा.

००००००००००

कृषी अधिकारी कोट

लवकर, मध्यम आणि उशिरा अशा तीन प्रकारचे सोयाबीन शेतकऱ्यांना घेता येते. त्यामुळे पाऊस केव्हाही आला तरी शेतकऱ्यांना सोयाबीन चांगले उत्पन्न देऊ शकते. सध्या लवकर येणाऱ्या सोयाबीनला चांगले दिवस आले आहेत. बाजारभावही चांगला मिळतो.

- एस.एम. तोटावार

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वाशिम