शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

स्वयंचलित हवामान केंद्र स्थापनेचा तिढा सुटला!

By admin | Updated: July 5, 2017 01:17 IST

‘लोकमत’ने वेधले होते लक्ष : जिल्ह्यात ४६ मंडळातील स्थळे निश्चित

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : राज्य शासनाच्या निर्णयानुसार, जिल्ह्यात महसूल मंडळनिहाय हवामान तपासणी केंद्र स्थापनेच्या प्रक्रियेला वेग मिळाला आहे. स्वयंचलित हवामान केंद्रांच्या स्थापनेसाठी जागा निश्चित करण्यात निर्माण झालेल्या तांत्रिक अडचणी दूर करून जिल्ह्यातील सर्वच ४६ मंडळात स्वयंचलित हवामान केंद्रांसाठी स्थळे निश्चित करण्यात आली आहेत. या ठिकाणी हवामान केंद्र स्थापन करण्यासाठी पुढील कार्यवाहीसुद्धा सुरू झाली असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून मंगळवारी देण्यात आली. स्वयंचलित हवामान केंद्रांसाठी जागा निश्चितीकरणात निर्माण झालेल्या तिढ्याबाबत लोकमतने वृत्त प्रकाशित करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते. महाराष्ट्रात सुमारे २,०६५ हवामान केंद्र सार्वजनिक खासगी भागीदारी (पब्लिक प्रायव्हेटर पार्टनरशिप) मॉडेल येणार आहेत. यातील १ हजार केंद्र चालू महिन्याच्या अखेरपर्यंत अर्थात जून २०१७ पर्यंत स्थापित होण्याचा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला होता. नागपूर जिल्ह्यातील डोंगरगाव येथे मे महिन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते राज्यातील पहिल्या स्वयंचलित हवामान केंद्राचे उद्घाटनही करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना हवामानाचा अचूक अंदाज यावा आणि शेती उद्योग यशस्वीपणे करता यावा म्हणून शासनाने राज्यभरातील प्रत्येक महसूल मंडळात स्वयंचलित हवामान केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या अंतर्गत वाशिम जिल्ह्यातील ४६ मंडळात ही हवामान केंद्र स्थापन होणार आहेत. तथापि, हवामान केंद्र स्थापन करण्यासाठी आवश्यक असलेल्या स्थळांचे निश्चितीकरण करण्यात अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यामुळे जून महिन्याच्या १५ तारखेपर्यंत केवळ १६ स्थळे निश्चित होऊ शकली होती. संबंधित विभागांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या सुचनेनुसार कार्यवाही करून त्यांच्याकडे या संदर्भातील अहवाल सादर केला. जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीनंतर कृषी आणि महसूल विभागाकडून आता उर्वरित ३६ स्थळे निश्चित करण्यात आली असून, स्वयंचलित हवामान केंद्र सुरू करण्यासाठी त्या सर्वच ठिकाणी पुढील कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. राज्यात हवामान केंद्रांची स्थापना करण्यासाठी शासनाचा स्कायमेट कंपनीशी करार झाला आहे. शेतकऱ्यांना मिळेल अचूक माहिती हवामानाचा अंदाज यावा म्हणून राज्यात पूर्वी एकूण ८ हवामान केंद्रे होती; मात्र शेतकऱ्यांना हवामानाचा अचूक अंदाज यावा आणि आपला शेती उद्योग यशस्वीपणे करता यावा, यासाठी राज्य शासनाने राज्यात २ हजार हवामान केंद्रे स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. हा देशातील एकमेव प्रकल्प आहे. यामुळे वाऱ्याची दिशा, वाऱ्याची गती, हवेचे तापमान, सापेक्ष आर्द्रता आणि पावसाचे परिमाण मोजले जाईल. ही माहिती शेतकऱ्यांबरोबर शेअर केली जाईल, ज्यामुळे त्यांना हवामानाच्या अनुसार उत्तम व नियोजनबद्ध पद्धतीने पेरणी करता येईल. शेतकऱ्यांसाठी विविध क्षेत्रातील हवामानविषयक स्थिती महावेध पोर्टल (महाराष्ट्र कृषी हवामान माहिती नेटवर्क) आणि स्कायमेटच्या मोबाइल अ‍ॅप्लिकेशनवर उपलब्ध असेल.