शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

तूरीचे विक्रमी उत्पादन घेणारा ‘तो’ शेतकरी ठरतोय प्रेरणादायी

By admin | Updated: January 15, 2017 19:54 IST

एका एकरात तूरीचे विक्रमी उत्पादन घेणारा मांडवा येथील शेतकरी इतरांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

ऑनलाइन लोकमतशीतल धांडे /ऑनलाइन लोकमत 
रिसोड (वाशिम), दि. 15 - एका एकरात तूरीचे विक्रमी उत्पादन घेणारा मांडवा येथील शेतकरी इतरांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. तूर पीक पाहण्यासाठी विदर्भ व मराठवाड्यातील अनेक शेतकऱ्यांनी भेटी दिल्या आहेत. बद्रीनारायण विक्रम कायंदे असे त्या शेतकऱ्याचे नाव आहे.
मांडवा येथील बद्रीनारायण कायंदे हे शेतीत नवनवे प्रयोग करून इतरांपेक्षा अधिक उत्पादन घेतात. असाच प्रयोग त्यांनी तूर पिकासंदर्भात केला आहे. सहा एकरावर त्यांनी ‘ज्योती’ जातीच्या तूरीची  १४ बाय दोन फुट अंतरावर लागवड केली. ५० टक्के सेंद्रीय व ५० टक्के रासायनिक खते दिली. शेतातील विहिरीच्या पाण्यातून ठिबकद्वारे तूरीला सिंचन केले. सेंद्रीय खतांमुळे तूर पीक चांगेलच बहरले, असे कायंदे म्हणतात. एका झाडाला कमीत-कमी दोन ते सव्वा दोन हजार शेंगा आहेत. लागवडीपासून ते आतापर्यंत त्यांना एकरी १५ हजार रुपयाच्या आसपास खर्च आला आहे. एकरी १५ ते १७ क्विंटल तूर होईल, असा विश्वास कायंदे यांनी व्यक्त केला. या तूरीच्या झाडांचे समूळ उच्चाटन न करता, केवळ छाटणी केली जाणार आहे. छाटणी केल्यानंतर पाणी देऊन परत उन्हाळी तूरीचे पीक घेतले जाईल, असे कायंदे म्हणाले. या तूरीच्या झाडांना सलग पाच वर्षे जगविण्याचे नियोजन केले आहे. त्यामुळे लागवड खर्चात आपसूकच बचत होईल, असा दावा कायंदे यांनी केला. या तूरीच्या शेताची पाहणी करण्यासाठी कृषी सभापती विश्वनाथ सानप, कृषी विज्ञान केंद्र करडा येथील अधिकारी, कृषी अधिकाºयांसह विदर्भ व मराठवाड्यातील जवळपास १२०० ते १३०० शेतकरी आले होते, असेही कायंदे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. १५ हजार रुपये लागवड खर्च जाता एकरी ८५ हजार रुपयांच्या असपास उत्पादन या रब्बी हंगामात आणि त्यानंतर उन्हाळी हंगामात ८० हजार रुपयाच्या आसपास उत्पादन मिळेल, असा विश्वास कायंदे यांनी व्यक्त केला.