राज्यातील वाढता कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लागू केलेल्या संचारबंदीसह इतर निर्बंंध आणखी कठोर करण्याचे बुधवारी जाहीर केले होते. गुरुवारी (दि.२२ एप्रिल) रात्री आठ वाजल्यापासून नवीन नियमावली लागू झाली असून, या नियमावलीची अंमलबजावणी मेडशी येथे सुरू झाली. वाशिम जिल्ह्याचे प्रवेशद्वार असलेल्या मेडशी येथे चेक पोस्टवर जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत परदेशी यांनी भेट दिली. यावेळी पोलीस जमादार ताजने, तिखिले, पोलीस कॉन्स्टेबल गजानन टाले, विलास गायकवाड, सहायक पोलीस उपनिरीक्षक वाघ यांची उपस्थिती होती. बाहेर जिल्ह्यातील सुमारे २५ ते ४० जणांना वाशीम जिल्ह्याच्या प्रवेशद्वार असलेल्या चेक पोस्ट चौकीवरून परत पाठविण्यात आले, तर वाशिम जिल्ह्यातून अकोला जिल्हामध्ये प्रवेश करणाऱ्या पंधरा, वीस जणांना परत पाठविण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा पुन्हा गतवर्षीच्या ठिकाणी पोलीस चौकीची चेकपोस्ट करण्यात आलेली आहे.
मेडशी चेकपोस्टनजीक वाहनांची तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:40 IST