शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

मंगरुळपीरमधील कामांची चौकशी थंडबस्त्यात

By admin | Updated: July 9, 2017 19:44 IST

मंगरुळपीर: शहरात शासनाच्या निधीतून मागील चार ते पाच महिन्यांपासून करण्यात आलेल्या विविध विकास कामांत नियमांना बगल देण्यात आल्याच्या तक्रारी आमदार लखन मलिक यांच्यासह शासनाकडे नगरसेवकांनी केल्यात.

लोकमत न्यूज नेटवर्कमंगरुळपीर: शहरात शासनाच्या निधीतून मागील चार ते पाच महिन्यांपासून करण्यात आलेल्या विविध विकास कामांत नियमांना बगल देण्यात आल्याच्या तक्रारी आमदार लखन मलिक यांच्यासह शासनाकडे नगरसेवकांनी केल्यात. या तक्रारीची दखल आमदार लखन मलिक यांनी घेऊन मंगरुळपीरच्या मुख्याधिकाऱ्यांना २८ जून रोजी एक पत्र पाठवून चौकशी करण्याची सूचना दिली आहे; परंतु या पत्रानुसार मुख्याधिकाऱ्यांची चौकशी थंडबस्त्यात आहे. मंगरुळपीर शहरांतर्गत विविध विकास कामे करण्यासाठी शासनाकडून २९  लाख ३० हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या निधीतून शहरात पेव्हरब्लॉक रस्ते, तसेच नाल्यांच्या कामांसह इतर विकास कामे करण्यात येत आहेत. त्यामधील बहुतेक कामे पूर्ण झाली असून, एकूण १५ कामांपैकी १४ कामे निकृष्ट असल्याच्या तक्रारी नागरिक आणि नगर सेवकांनी मुख्याधिकाऱ्यांसह विविध स्तरावर केल्या होत्या. त्या तक्रारींची दखल पालिकेच्या संबंधित प्रशासनाकडून घेण्यात आली नाही. याबाबत वाशिम-मंगरुळपीर विधानसभा मतदार संघाचे आमदार लखन मलिक यांच्याकडेही तक्रार करण्यात आली. त्यांनी नागरिकांसह नगरसेवकांच्या तक्रारीची दखल घेत मंगरुळपीर नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना एक पत्र पाठवित सर्व कामांची चौकशी करून संबंधित कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्यात यावे व चालू असलेल्या आणि झालेल्या कामाची तपासणी सार्वजनिक बांधकाम विभागव गुणनियंत्रण विभागाकडून करावी, तसेच चौकशी पूर्ण होईपर्यंत कोणत्याही कामाचे देयक अदा करू नये, अशा सूचना दिल्या आहेत. तथापि, याला १० दिवस उलटून गेले, तरी मुख्याधिकाऱ्यांकडून काय चौकशी करण्यात आली किंवा कंत्राटदारांना कोणत्या सूचना देण्यात आल्या. ते कोणालाही माहिती नाही. त्यावरून मंगरुळपीर नगर पालिका प्रशासन पारदर्शकतेबाबत किती गंभीर आहे, त्याची प्रचिती येत असून,  या प्रकाराची दखल आता जिल्हाधिकाऱ्यांनीच घेणे आवश्यक आहे.  दरम्यान, याबाबत वस्तूस्थिती जाणून घेण्यासाठी मुख्याधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; परंतु प्रतिसाद मिळू शकला नाही.