शिक्षक, शिक्षकेतरांच्या सामूहिक सभेत मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना येणाऱ्य अडचणींवर चर्चा करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व संघटनांनी एकत्र येऊन वज्रमूठ बांधण्यात आली. तसेच शासन व प्रशासनस्तरावर समस्या सोडविण्यासाठी संघर्ष समितीची स्थापना करण्यात आली. या समितीत अध्यक्ष म्हणून मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष प्रा. बाळासाहेब गोटे, कार्याध्यक्ष म्हणून सोनाजी इंगळे, कास्ट्राइब शिक्षक संघटना, उपाध्यक्ष म्हणून संदीप देशमुख शिक्षक महासंघ जिल्हाध्यक्ष, महेश उगले जिल्हाध्यक्ष भाजप शिक्षक सेल, सचिव म्हणून प्रा. रमेश आरु, जिल्हाध्यक्ष शिक्षक आघाडी व प्रवीण कदम शिक्षण संघर्ष संघटना जिल्हा उपाध्यक्ष, सहसचिव म्हणून गजानन कोरडे जिल्हाध्यक्ष अमरावती विभागीय शिक्षक संघ कोषाध्यक्ष म्हणून प्रा. दिलीप आंबेकर जिल्हाध्यक्ष, बहुजन माध्यमिक शिक्षक संघ तर उर्दू विभाग समन्वयक म्हणून तन्वी पठाण जिल्हाध्यक्ष उर्दू शिक्षक माहसंघ यांची निवड करण्यात आली,
शिक्षक, शिक्षकेतरांच्या समस्या सोडविण्यासाठी संघर्ष समितीचा पुढाकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:41 IST