शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी तेव्हा त्याच रूममध्ये होतो..."; ट्रम्प यांच्या युद्धविरामासंदर्भातील दाव्यावर एस जयशंकर यांची अमेरिकेतून पहिली प्रतिक्रिया
2
धक्कादायक...! धावत्या ट्रेनमध्ये टीसीला कपडे फाडून मारहाण! एलटीटी-हटिया एक्सप्रेसमधील घटना
3
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
4
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले
5
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
6
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
7
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
8
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
9
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
10
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
11
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
12
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
13
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
14
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
15
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
16
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
17
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
18
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
19
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
20
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार

जलमुक्त होळी खेळण्यासाठी पुढाकार

By admin | Updated: March 24, 2016 02:44 IST

‘लोकमत’च्या आवाहनाला वाशिम जिल्ह्यात प्रतिसाद; शासकीय कार्यालयांसह विद्यार्थीही सरसावले.

शिखरचंद बागरेचा / वाशिमअत्यल्प पावसाळा आणि त्यामुळे निर्माण झालेल्या भीषण पाणीटंचाईचे भान राखून पाण्याची नासाडी न करता 'जलमुक्त होळी' साजरी करण्याचे आवाहन 'लोकमत'ने केले आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत राष्ट्रीय हरित सेनेसह मारवाडी युवा मंच व शालेय विद्यार्थ्यांनी रंगपंचमीला पाण्याची नासाडी न करण्याची शपथ घेतली व पाणी वाचविण्याकरिता 'जलमुक्त होळी' साजरी करण्याचे आवाहन इतरांनाही केले. 'लोकमत'ने जलमुक्त होळी साजरी करण्याचे आवाहन केल्यानंतर वाशिम येथील लायनेस क्लबच्यावतीने कार्यक्रम घेऊन जलमुक्त होळी साजरी करण्यासाठी घोषवाक्यांतून जनतेला आवाहन केले जात आहे. यावेळी क्लबच्या अध्यक्ष श्‍वेता बडजात्या, सचिव अर्चना डाळे, सदस्य कमला बगडिया, पूजा अग्रवाल, सोनल अग्रवाल, राकेश पटेल, रश्मी सेठी, माला वंजाणी यांच्या उपस्थितीत 'जलमुक्त होळी'खेळण्याची शपथ घेण्यात आली.वाशिम येथील युवा क्रांती मंचच्यावतीने ह्यजलमुक्त होळीह्ण खेळण्याची शपथ घेण्यात आली. यावेळी नीलेश सोमाणी, भारती सोमाणी, पवन मानधने, पूनम मानधने, सुनील कासट, पूजा कासट, जसराज केला, पूजा केला, निता कासट, पूनम कासट यांचा समावेश होता. वाशिम येथील जेसीआय क्लबच्यावतीने ह्यजलमुक्त होळीह्ण साजरी करण्याच्या ह्यलोकमतह्णच्या आवाहनाला प्रतिसाद देत जनजागृती कार्यक्रम घेतला. यावेळी सुनिल चांडक, पंकज बाजड, जितेंद्र बोडस, शैलेश सोमाणी, सौरभ गट्टाणी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. वाशिम येथील निसर्ग युवा मित्र मंडळ व के.के. गोटे मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने २३ मार्च रोजी जलमुक्त होळी साजरी करण्याची शपथ घेण्यात आली. यावेळी दशरथ वाटाणे, के.के. गोटे, शंतनु खिराडे, स्वप्निल गव्हाळे, युवराज जाधव, सौरभ आहाळे, संतोष इढोळे, सागर खिल्लारे, सागर सोनुने, अरुण भगत, जे.डी. सर यांच्यासह अनेक जण उपिस्थत होते. वाशिम येथील स्वामी सर्मथनगर मंडळाच्यावतीने या भागातील युवकांची २३ मार्च रोजी बैठक झाली. ह्यलोकमतह्णने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत ह्यजलमुक्त होळीह्ण खेळण्याची व याबाबत जनजागृती करण्याची शपथ यावेळी योगेश भोयर, मोहित जमधाडे, राम डाखोरे, प्रवीण शिंदे, गणेश अंदुरकर, विवेक दुबे, रोहित वाघ, चेतन जाधव, योगेश फाले, प्रदीप बडवे, प्रा. महेश तांदळे, प्रा. भास्कर भिसे, ऋषभ माळोदे, विशाल व्यवहारे, सुशील देशमुख यांनी घेतली. मारवाडी युवा मंचच्यावतीने ह्यजलमुक्त होळीह्ण खेळण्याची शपथ अमित वर्मा, सुमीत चांडक, मनीष मंत्री, सचिन करवा, पुनीत शर्मा, आशिष लढ्ढा, प्रेम अग्रवाल, संजोग छाबडा आदींनी घेऊन जनजागृती केली.