शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

टेम्पल गार्डनच्या भ्रष्टाचाराच्या चाैकशीसाठी खासदारासह दाेन आमदारांचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:41 IST

वाशिम : शहरातील टेम्पल गार्डन व नाट्यगृहावर जवळपास २० काेटी रुपये खर्च हाेऊनही काम पूर्णत्वास आलेले नाही. याकामात माेठ्या ...

वाशिम : शहरातील टेम्पल गार्डन व नाट्यगृहावर जवळपास २० काेटी रुपये खर्च हाेऊनही काम पूर्णत्वास आलेले नाही. याकामात माेठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून याच्या चाैकशीसाठी खासदारासह एक विद्यमान आमदार व एका माजी आमदाराने दंड थाेपटले आहे. यामुळे नगरपरिषद प्रशासनासह कंत्राटदार चांगलेच अडचणीत आल्याचे बाेलले जात आहे.

गत आठवड्यात वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री ना. शंभुराज देसाई यांचा वाशिम जिल्हा दौरा नियोजित होता. यावेळी वाशिमच्या खा. भावनाताई गवळी, आ. लखन मलिक आणि माजी आ. ॲड. विजयराव जाधव यांनी पालकमंत्र्यांची संयुक्त भेट घेऊन स्थानिक टेम्पल गार्डन आणि नाट्यगृह यात झालेला भ्रष्टाचार आणि अनियमिततेचा पाढाच वाचला. ही कामे २०११ पासून सुरू असून अद्यापही पूर्ण झालेली नाहीत. यातील बरीचशी कामे पूर्णत्वाकडे असल्याचा दावा न. प. चा असून प्रत्यक्षात पाहणी केली तेव्हा झालेली सर्व कामे नासधूस आणि उद्‌ध्वस्त झाली आहेत. जवळजवळ वीस कोटींची ही कामे अशा दुरवस्थेत आहेत की, त्यामुळे जनतेचा कोट्यवधींचा अपव्यय झाल्याचे स्पष्ट होते. या प्रकरणाची चाैकशी करण्याची मागणी खा. भावना गवळी, आमदार लखन मलिक व माजी आमदार विजयराव जाधव यांनी केली. प्रथमच विकास कामासाठी शिवसेनेच्या खासदार व भाजपचे आमदार एकत्र आल्याने विकास कामांना गती मिळणार असल्याची चर्चा नागरिकांत ऐकण्यास मिळत आहे.

................

दाेषींवर निश्चित कारवाई : पालकमंत्री देसाई

टेम्पल गार्डन व नाट्यगृह कामाची विभागीय चौकशी करून जबाबदारी निश्चित करण्यात येईल व वसुली देखील करण्यात येईल. याबाबत आपण जिल्हाधिकारी यांना सूचितही केले आहे. दोषींवर निश्चित कारवाई करण्यात येईल, असे पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी सांगितले.

टेम्पल गार्डनच्या भ्रष्टाचाराच्या चाैकशीपेक्षा हे काम त्वरित पूर्ण हाेणे गरजेचे आहे. टेम्पल गार्डन जनसेवेत रुजू व्हावे, याकरिता आपण पुढाकार घेतला आहे.

- विजयराव जाधव, माजी आमदार

टेम्पल गार्डनच्या भ्रष्टाचाराची चाैकशी हाेऊन कामात दिरंगाईचे कारण शाेधून दाेषींवर कारवाई तसेच त्वरित टेम्पल गार्डन सुरू करण्यासाठी पाठपुरावा करावा

- लखन मलिक, आमदार

२०११ पासून सुरू असलेले काम तब्बल १० वर्षांचा काळ उलटूनही पूर्ण हाेत नाही, याला काय म्हणावे. काेट्यवधी रुपयांचे साहित्य धूळखात पडले आहे. याला जबाबदार काेण, याची चाैकशी झाली पाहिजे. याेग्य नियाेजन नसल्याने आज शहरवासी गार्डनपासून वंचित आहेत.

- भावनाताई गवळी, खासदार