शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

इंगलवाडीवासीयांना प्यावे लागत आहे दूषित पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:43 IST

मानोरा : तालुक्यातील शेवटच्या टोकावर डोंगराळ भागात वसलेल्या इंगलवाडी या गावाला २२ जुलै रोजी मोठ्या पुराला सामोरे जावे लागले ...

मानोरा : तालुक्यातील शेवटच्या टोकावर डोंगराळ भागात वसलेल्या इंगलवाडी या गावाला २२ जुलै रोजी मोठ्या पुराला सामोरे जावे लागले होते. पुरात पूर्णपणे बुडालेल्या आणि पिण्यासाठी वापरण्यात येत असलेल्या विहिरीतील पुराचे साचलेले पाणी न उपसल्यामुळे स्थानिक नागरिकांना दूषित पाणी पिण्याचा प्रसंग निर्माण होऊन साथरोग पसरून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे.

तालुक्यातील मोठ्या नद्यांपैकी एक असलेल्या पूस नदीला मागील आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे आणि जवळा येथील पाझर तलाव फुटल्याने २२ जुलै राेजी पूर परिस्थिती निर्माण झाली होती. सहाशे ते सातशेच्या आसपास लोकसंख्या असलेल्या इंगलवाडी गावचे ग्रामस्थ पूस नदीच्या तीरावर असलेल्या विहिरीचे पाणी मागील अनेक वर्षांपासून पिण्यासाठी वापरीत आहेत. इंगलवाडी येथील पिण्याच्या पाण्याची विहीर पूर्णपणे या पुराच्या प्रवाहात बुडालेली होती. ग्रामस्थ पिण्यासाठी वापरत असलेल्या विहिरीचे पाणी पूर प्रवाहामुळे दूषित झालेले असूनही ग्रामपंचायत प्रशासनाने त्या विहिरीचा उपसा तातडीने केला नसल्याने या पुराच्या पाण्याने पूर्णपणे दूषित झालेल्या विहिरीतील पाणी इंगलवाडी येथील नागरिक संजय रामराव राठोड यांनी पिण्यासाठी नेले असता त्यांची १६ वर्षीय मुलगी पोटाच्या वेदनेने आजारी पडली आहे.

स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाने दूषित पाण्यापासून नागरिकांना वाचविण्यासाठी पुराचे पाणी ओसरताच तातडीने या विहिरीतील दूषित पाण्याचा उपसा करणे गरजेचे असतांना दूषित विहिरीतच ब्लिचिंग पावडर टाकल्याने विहिरीतील जलजीव आणि मासे मरून विहीर अधिकच दूषित झाल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

ग्रामपंचायत प्रशासनाने आपली जबाबदारी झटकल्याने या गावच्या ग्रामस्थांना जलजन्य व साथीचे आजार होण्याची संभावना नाकारता येत नाही. इंगलवाडीचे ग्रामसचिव गवळी यांचेशी दूरध्वनीवर वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न करूनही त्यांनी प्रतिसाद दिला नाही.