शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

अर्भक मृत्यूचे प्रमाण घटले

By admin | Updated: September 17, 2014 01:20 IST

आशा ठरल्यात देवदूत : रूग्णालयातील प्रसूती संख्येत वाढ

जगदीश राठोड / मानोरागर्भवती महिला आणि नवजात अर्भकांसाठी आशा सेविका देवदूत ठरत असल्याचे चित्र मानोरा तालुक्यात दिसत आहे. आशा सेविका घरोघरी जाऊन गर्भवती माताची नोंद करतात आणि आरोग्य केंद्रातच प्रसूती करून घेण्यासाठी गर्भवती मातांना प्रवृत्त करीत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात घरीच करण्यात येणार्‍या प्रसुतीचे प्रमाण कमी झाले असून, तालुक्यातील आरोग्य केंद्रांत प्रसुतीचे प्रमाण वाढल्यामुळे प्रसुतीदरम्यान नवजात अर्भक मृत्यूचे प्रमाण कमी होत असल्याचा दावा आरोग्य अधिकार्‍यांनी केला आहे. पूर्वी ग्रामीण भागात रूग्णालयाऐवजी गर्भवती महिलांची घरीच प्रसूती करण्याकडे कल होता. त्यामुळे जन्माला येणार्‍या कित्येक बालकांना गावामधील अपुर्‍या सोयी सुविधाअभावी उपचार मिळत नव्हते. परिणामी नवजात अर्भक मृत्यूमध्ये मोठय़ा प्रमाणात वाढ झाली होती. आता गत काही वर्षापासून आशा सेविकांच्या माध्यमातून आरोग्य जनजागृतीची मोहीम शासनाने हाती घेतली आहे. आदिवासी ग्रामीण कुटुंबातील गरोदर महिलांची माहिती घेऊन नोंदी करण्याची जबाबदारी या आशा सेविकांवर सोपविण्यात आली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात बालकाचे शारीरिक तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी विशिष्ट प्रकारच्या ह्यकीटह्ण वापरण्यात येतात. त्यामुळे बालकांना आरोग्य सुविधा मिळतात व बालमृत्यूचे प्रमाण कमी होते. मानोरा तालुक्यात तीन प्राथमिक आरोग्य केंद्राव्यतिरिक्त २४ उपकेंद्राची स्थापना केली आहे. या सर्व केंद्रातून प्रसूतीची व्यवस्था केली आहे. आशा सेविका, दाई बैठका, भरारी पथक, जननी सुरक्षाद्वारे नवजात अर्भक मृत्यू घटविण्यात यश आले आहे. यासाठी आशा वर्कर घरोघरी जाऊन गरोदर मातेला आरोग्य केंद्रात प्रसूतीसाठी प्रवृत्त केल्यामुळे शक्य झाले आहे. मानोरा तालुक्यातील ११३ गावात आरोग्य सुविधा देण्यात आल्या आहे.दरम्यान तालुका आरोग्य अधिकारी यांनी जननी सुरक्षा योजनेला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे सांगीतले. मानव विकास मिशन अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्रावर गरोदर मातांना सेवा मिळत असल्याने घरी प्रसूती होण्याच्या प्रमाणात घट झाली आहे. मानव विकास मिशन अंतर्गत आठ महिन्याच्या गरोदर मातास २00 रूपये आणि प्रसूतीनंतर २000 रूपये मदत मिळते. त्यामुळे त्यांना काळजी घेण्यास मदत होते. आता जवळपास ९0 टक्के प्रसूती दवाखान्यात होत असल्याचे त्यांनी सांगीतले.