शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

कडक निर्बंधात घरपोच सिलिंडर; पण डिलिव्हरी बॉयचे लसीकरण केव्हा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:29 IST

वाशिम : अत्यावश्यक सेवेत समावेश असलेल्या गॅस सिलिंडरचे घरपोच वितरण केले जात आहे. मात्र, दुसरीकडे डिलिव्हरी बॉयला लसीकरणात प्राधान्य ...

वाशिम : अत्यावश्यक सेवेत समावेश असलेल्या गॅस सिलिंडरचे घरपोच वितरण केले जात आहे. मात्र, दुसरीकडे डिलिव्हरी बॉयला लसीकरणात प्राधान्य नसल्याने, कोरोना संसर्गाचा धोका नाकारता येत नाही.

संपूर्ण देशात व राज्यात लसीकरण कार्यक्रम सुरु झाला आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य अधिकारी, कर्मचारी, डॉक्टर्स, फ्रंटलाईन वर्कर्स यांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली. त्यानंतर अन्य शासकीय अधिकारी, कर्मचारी, ज्येष्ठ नागरिकांना लस देण्यात आली. दरम्यान, कोरोनाकाळात तसेच कडक निर्बंधांच्या काळात घरपोच गॅस सिलिंडर पोहोचविणाऱ्या डिलिव्हरी बॉयला मात्र लसीकरणात प्राधान्य देण्यात आले नाही. जीवावर उदार होऊन डिलिव्हरी बॉय घरपोच सेवा देत असल्याने त्यांना लसीकरणात प्राधान्य मिळणे आवश्यक आहे. वाशिम शहरात ५२ हजारांच्या आसपास गॅस सिलिंडर जोडण्या आहेत. कोरोनाकाळातील ही सेवा लक्षात घेता लसीचा पहिला व दुसरा डोस देण्यात यावा, असा सूर उमटत आहे.

०००

सिलिंडर सॅनिटाईज केले का?

कोरोना विषाणू संसर्ग टाळण्यासाठी सिलिंडर घरात नेण्यापूर्वी सॅनिटाईज करणे आवश्यक आहे. सॅनिटाईज केल्याशिवाय सिलिंडरला हात लावू नये. लहान मुलांना सिलिंडरपासून दूर ठेवणे आवश्यक आहे. पूर्णपणे सॅनिटाईज केल्यानंतरच घरात सिलिंडर न्यावे.

००००

४ डिलिव्हरी बॉय पॉझिटिव्ह

कोरोनाकाळात घरपोच सेवा देताना आवश्यक ती खबरदारी डिलिव्हरी बॉयकडून घेण्यात येते. तथापि, दुसऱ्या लाटेत चार डिलिव्हरी बॉईजना कोरोना संसर्ग झाला. सौम्य लक्षणे असल्याने चार जणांनी कोरोनावर सहज मात केली. कोरोनावर प्रभावी उपाय म्हणून लसीकरणाकडे पाहिले जाते. त्यामुळे लसीकरणात प्राधान्य द्यावे, असा सूर उमटत आहे.

००००

कोरोना प्रतिबंधक लस देण्यात यावी !

कोट

कोरोनाकाळातही घरपोच गॅस सिलिंडर पोहोचविण्यात येत आहेत. प्रत्येक ग्राहकाशी जवळून संपर्क येत असला तरी आवश्यक ती खबरदारी घेण्यात येते. लसीकरण झाले तर अतिउत्तम ठरेल.

- माधवराव गावंडे, डिलिव्हरी बॉय

०००००००

कोरोनावर प्रभावी उपाय म्हणून लसीकरण करण्यावर भर दिला जात आहे. मात्र, डिलिव्हरी बॉयला यामध्ये प्राधान्य नाही. घरपोच सेवा दिली जात असल्याने लसीकरणात प्राधान्य असावे.

- संतोष बांगर, डिलिव्हरी बॉय

०००००००

शहरी व ग्रामीण भागात कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे. आम्ही तर घरपोच सेवा देत असतानाही लसीकरणात प्राधान्य नाही. त्यामुळे लसीकरण झाले नाही. गॅस सिलिंडर घरपोच पोहोचविणाऱ्या डिलिव्हरी बॉय, चालकांना लसीकरणात प्राधान्य द्यावे.

- परवेश राऊत, डिलिव्हरी बॉय

००००

शहरातील एकूण घरगुती ग्राहक - ५२,०००

गॅस वितरीत करणाऱ्या एजन्सी - ४

घरपोच डिलिव्हरीसाठी असणारे कर्मचारी - ३२

किती कर्मचाऱ्यांनी घेतला पहिला डोस - ११

किती कर्मचाऱ्यांनी घेतला दुसरा डोस - ०२

एकही डोस न घेणारे कर्मचारी - २१

००००००००००००००